WhatsApp वर नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा तुमचे ग्रुप्स WhatsApp वरील कम्युनिटींमध्ये जोडताना लक्षात ठेवण्यायोग्य काही मुख्य गोष्टी.
रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी तुमच्या ॲडमिन आणि सदस्यांना सक्षम करा आणि सहयोग करा.
विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कम्युनिटी वाढवण्यासाठी WhatsApp कशा प्रकारे वापरतात ते पहा.
सुरक्षा हा WhatsApp वरील अनुभवाचा गाभा आहे. तुमची कम्युनिटी सुरक्षित जागा असणे महत्त्वाचे आहे जेथे लोक अर्थपूर्णरित्या कनेक्ट होऊ शकतात. तुम्हाला आणि तुमच्या सदस्यांना सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी खाली टूल आणि फीचर यांची लिस्ट दिली आहे.
गोपनीयता आणि सुरक्षा आमच्या रक्तात भिनलेली आहे आणि त्यासाठीच आम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन बील्ट केले आहे. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे केवळ तुम्ही आणि ज्या व्यक्तिसोबत तुम्ही कम्युनिकेट करत आहात ती व्यक्ती काय पाठवले आहे ते वाचू किंवा पाहू शकतात. त्यामध्ये कोणीही नसेल, अगदी WhatsApp देखील नाही.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनबाबत अधिक.
तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम केले पाहिजे. एखादी व्यक्ती भिन्न डिव्हाइसवरून तुमच्या WhatsApp खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असल्यास, तुमच्या नंबरवर पाठवलेला एक ६-अंकी कोड त्या व्यक्तीने प्रविष्ट करणे तसेच एक अतिरिक्त पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर प्रविष्ट करणे गरजेचे आहे. कोणासोबतही तुमचा पिन कधीही शेअर करू नका. अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून तुम्ही फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरून तुमच्या फोनवर आणि/किंवा डेस्कटॉपवर WhatsApp खाते लॉक करू शकता.
तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर ते २४ तास, ७ दिवस, किंवा ९० दिवस एक्स्पायर होणारे मेसेजेस सेट करू शकता. अतिरिक्त गोपनीयतेसाठी, प्राप्तकर्त्याने एकदा उघडल्यानंतर WhatsApp चॅटवरून नाहीसे होतील असे फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता. अफवा पसरवणे, व्हायरल मेसेज आणि खोट्या बातम्या टाळण्यासाठी तुम्ही काय फॉरवर्ड करता त्याबद्दल सावधगिरी बाळगा - विशेषतः जर तो साखळी मेसेज असेल आणि "खूप वेळा फॉरवर्ड केलेले" लेबलसह प्रदर्शित झाला असेल.
तुम्ही विशिष्ट संपर्कांना बब्लॉॉक करून त्यांच्याकडील मेसेजेस, कॉल्स आणि स्टेटस अपडेट्स प्राप्त करणे थांबवू शकता. सिंगल मेसेज दीर्घकाळ-दाबून तुम्ही समस्यात्मक मेसेजेस आणि खात्यांची तक्रार देखील करू शकता.
अॅडमिन म्हणून, तुम्हाला तुमची कम्युनिटी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार आहे. ग्रुपचा विषय, चिन्ह आणि वर्णन कोण बदलू शकते हे तुम्ही प्रतिबंधित करू शकता.
अॅडमिन अवांछित मेसेजेस हटवू शकतात किंवा कम्युनिटीतील व्यत्यय आणणारे सदस्य काढून टाकू शकतात. तुम्ही ग्रुप देखील काढू शकता किंवा आवश्यकता असल्यास कम्युनिटी निष्क्रिय करू शकता. सामील होण्यासाठी नवीन सदस्यांना आमंत्रित करताना, सार्वजनिक फोरम किंवा वेबसाइटवरील तुमच्या ग्रुपवर लिंक पोस्ट करू नका, केवळ तुम्हाला माहित अशलेल्या लोकांसोबत शेअर करा.
सदस्य म्हणून, तुम्हाला ग्रुपवर कोण जोडू शकते हे तुम्ही ठरवा. जर तुम्हाला ग्रुपमधून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही ते शांतपणे करू शकता. तुम्ही कम्युनिटी सोडली आहे हे फक्त अॅडमिनला कळेल.
कम्युनिटीतुन बाहेर पडा फीचर वापरून सदस्य कम्युनिटी सोडू शकतात. WhatsApp सुरक्षित ठेवण्यात आम्हाला मदत होण्यासाठी कोणताही अयोग्य किंवा हानीकारक कंटेन्ट WhatsApp कडे रिपोर्ट केला पाहिजे. कम्युनिटीच्या नोटिफिकेशनचा खूप त्रासदायक होत असल्यास, सदस्य ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करू शकतात.