आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा
  • आढावा
  • WhatsApp वर नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा तुमचे ग्रुप्स WhatsApp वरील कम्युनिटींमध्ये जोडताना लक्षात ठेवण्यायोग्य काही मुख्य गोष्टी.

    • १००: तुमची कम्युनिटी सेट अप करणे
    • १०१: सुरक्षित कम्युनिटी तयार करणे
    • १०२: एक चांगले कम्युनिटी ॲडमिन बनणे
    • १०३: कम्युनिटीली एंगेज कसे करावे आणि ती कशी वाढवावी
  • रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव तयार करण्‍यासाठी आणि राखण्‍यासाठी तुमच्‍या ॲडमिन आणि सदस्‍यांना सक्षम करा आणि सहयोग करा.

    • 200: सीमा प्रस्थापित करणे आणि चांगले कम्युनिटी वातावरण राखणे
    • 201: संघर्ष व्यवस्थापित करणे आणि समावेशास प्रोत्साहन देणे
    • 202: कम्युनिटी नियमांची अंमलबजावणी करणे आणि कठीण सदस्यांचे व्यवस्थापन करणे
    • 203: बहू-अॅडमिन कम्युनिटीसाठी भूमिका व्यवस्थापित करणे आणि नियुक्त करणे
  • विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कम्युनिटी वाढवण्यासाठी WhatsApp कशा प्रकारे वापरतात ते पहा.

    • आमचे कम्युनिटी बिल्डर
    • BTS आर्मी फेस्टापोरा
    • डोइशलॅंडमधील आफ्रिकन मम्स
    • एक प्रतिभावान मूल वाढवा
    • Givers Arena
    • Soy Super Papa (सर्वोत्कृष्‍ट वडिल आहे)

100: तुमची कम्युनिटी सेट करत आहे

सशक्त कम्युनिटीचा भाग असण्याने आपल्याला ही कम्युनिटी आपली वाटू लागते. तुमच्या कम्युनिटीच्या उद्दिष्टाची व्याख्या करण्याचे महत्त्व, आणि जिथे सदस्य एकमेकांना आदराने वागवतात आणि आनंदाने सहभागी होतात असे निरोगी वातावरण तयार करण्यात ॲडमिन्सनी बजावण्याची भूमिका, यावर आपण चर्चा करूया. चांगले नियम कसे लिहायचे ते शिका आणि तुमच्या कम्युनिटीचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन करण्यात मदत करण्यासाठी ॲडमिन्सची सहाय्यक टीम विकसित करा.

आम्ही पुरेसे विशिष्ट मार्गदर्शन प्रदान करू, पण ती तुमची वचनबद्धता, पॅशन आणि उद्दिष्ट असेल जे तुमची कम्युनिटी एकत्रित आणते.

जलद टिपा:

  • तुमच्या कम्युनिटीच्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण देण्यासाठी कम्युनिटीचे वर्णन वापरा;
  • विद्यमान ग्रुप जोडायचे की नवीन एखादा जोडायचा हे ठरवताना तुमच्या प्रेक्षकांचा विचार करा;
  • कम्युनिटीचे नियम कम्युनिकेट करण्यासाठी घोषणा ग्रुप वापरा;
  • कम्युनिटी आणि ग्रुप ॲडमिन साठी एकमेंकांशी संवाद साधण्याकरीता आणि म्युच्युअल समर्थन प्रदान करण्यासाठी केवळ ग्रुप-ॲडमिन सेट करा;

"WhatsApp कम्युनिटीज ग्रुपमधील उप-विषय तयार करण्यात मदत करतात, सदस्यांचे कार्यक्षम योगदान आणि त्यांच्या माहितीचे स्वागत करण्यास मदत करतात."

- निर्वीन, आई प्रेंझलॉअर बर्गमध्ये आहे

कम्युनिटी म्हणजे काय आणि त्या का महत्त्वपूर्ण आहेत?

कम्युनिटी म्हणजे शेअर केलेल्या गरजा आणि रुचींमुळे एकत्र येणाऱ्या लोकांचा ग्रुप. WhatsApp वर, कम्युनिटी बील्ड करणे हे उद्दिष्टासाठी असते - आकांक्षा, कारणे आणि सदस्यांसाठी अर्थपूर्ण अनुभवांद्वारे. हे सदस्यांना सहभागी होण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी आणि त्यांना रूची असलेले नवीन ग्रुप शोधण्यासाठी खाजगी आणि सुरक्षित जागा प्रदान करते.

तुम्ही नवीन कम्युनिटी तयार करत असाल किंवा एका छताखाली विद्यमान ग्रुप आणत असाल, तर तुमचे उद्दिष्ट, प्रेक्षक, आणि तुमच्या कार्यसंघातील अॅडमिनची भूमिका याबद्दल विचार करा.

कम्युनिटीज तुम्हाला थीमनुसार संभाषणे आयोजित करू देतात आणि घोषणा ग्रुपद्वारे - एकाच वेळी सदस्यांशी संवाद साधण्याचा पर्याय प्रदान करून माहिती ओव्हरलोड मर्यादित करतात.

कम्युनिटी व्यवस्थापनाच्या या चार महत्त्वाच्या पैलूंद्वारे जाणून घेऊया:

  • सर्व विस्तारीत करासर्व संकुचित करा
  • प्रत्येक कम्युनिटीचे एक उद्दिष्ट असते, एकत्र येण्याचे एक कारण जे समाजाला का आणि कसे जोडले जाणे आवश्यक आहे हे परिभाषित करते. शाळेसाठी, ते अपडेटेड शेड्युल शेअर करणे, स्वयंसेवकांसाठी, फुटबॉल चाहत्यांसाठी, संघटित होण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधणे, संपूर्ण सीझनमध्ये त्यांच्या आवडत्या कार्यसंघाला समर्थन देणे असू शकते.

    तुम्हाला एकत्रितपणे काय साध्य करायचे आहे आणि तुमच्‍या सदस्‍यांना काय फायदा होणार आहे हे ओळखून त्याबाबत संवाद साधणे ही चांगली पद्धत आहे. एक स्पष्ट उद्दिष्ट सदस्यांना ते कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेण्यात मदत करते.

    स्वतःला काही सोपे प्रश्न विचारण्यापासून सुरूवात करा:

    • तुम्हाला कम्युनिटी का बनवायची आहे?
    • तुमची कम्युनिटी कोणती भूमिका बजावते?

    तुमचे उद्दिष्ट निश्चित करून, पुढे व्हा आणि तुमची WhatsApp कम्युनिटी तयार करा. तुम्हाला याची आवश्यकता असेल:

    • तुमच्या कम्युनिटीला दृश्य स्वरूपात टिपणारा फोटो;
    • संस्मरणीय आणि तुमचे उद्दिष्ट प्रतिबिंबित करणारे नाव;
    • तुमच्या कम्युनिटीचे उद्दिष्ट सुस्पष्ट करणारे वर्णन.

    कम्युनिटी कशी तयार करायची

  • सशक्त आणि सकारात्मक संस्कृती तयार करताना, सदस्य योग्य कारणांसाठी कम्युनिटीमध्ये सामील झाले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. यासाठी पुढील गोष्टींचा विचार करा :

    • तुमचे लक्ष्य असलेला व्यक्तिसमूह कोणता?
    • हे लोक आधीच WhatsApp ग्रुप्सद्वारे जोडले गेले आहेत का?
    • अशा काही वेळा आहेत का जेव्हा या ग्रुप्सना समान माहिती मिळण्याचा फायदा होईल?

    उदाहरणार्थ : शाळेच्या कम्युनिटीमध्ये पालक, शिक्षक आणि अनेक वर्गातील विद्यार्थी आहेत. काही घोषणा या सर्व लोकांसाठी महत्त्वाच्या असतात - सुट्टीनंतर शाळा सुरु होण्याबद्दलच्या घोषणा, शाळेला सुट्टी लागणे, सभा. इतर संभाषणे यातील फक्त काही लोकांशी संबंधित आहेत - शिक्षक प्रशिक्षण, इयत्ता चौथीची फील्ड ट्रिप, सॉकर सामना.

    तुमच्या व्यक्तिसमूहाबद्दल आणि ते लहान आणि अधिक केंद्रित ग्रुप्समध्ये कसे विभागले जाऊ शकतात याचा विचार करा. याचा उपयोग तुम्ही विद्यमान ग्रुप्सना एकत्र आणायचे की तुमच्या कम्युनिटीमध्ये पूर्णपणे नवीन ग्रुप्स तयार करायचे हे ठरवण्यासाठी होईल.

    जसजसे नवीन सदस्य सामील होतील, तसतसे लोकांमध्ये नवीन विषय आणि कनेक्शन विकसित होतील. कम्युनिटी वाढत असताना ती उपयुक्त आणि सकारात्मक राहील याची खात्री करण्‍यासाठी तुमच्याकडे कम्युनिटी ॲडमिन म्‍हणून सदस्य आणि ग्रुप्सना जोडण्‍याची आणि काढून टाकण्‍याची क्षमता आहे.

    कम्युनिटी सदस्याला कसे आमंत्रित करायचे
    कम्युनिटी सदस्यांना कसे काढायचे

  • कम्युनिटी ॲडमिन्स कम्युनिटीचे व्यवस्थापन करणे, सदस्यांना परस्परसंवाद करण्यास प्रोत्साहन देणे, कम्युनिटी सर्वसमावेशक करणे तसेच ती सुरक्षित ठेवणे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. तुमच्या कामांमध्ये तुम्हाला साहाय्य करण्यासाठी, WhatsApp वरील कम्युनिटी तुम्हाला अशी साधने पुरवते ज्याचा वापर तुम्ही तुमचा ग्रुप आणि सदस्य व्यवस्थापित करण्यासाठी करू शकता आणि तुमच्या कम्युनिटीसाठी आनंददायक अनुभव सुनिश्चित करू शकता.

    कम्युनिटी अॅडमिन म्हणून, तुम्ही कम्युनिटी बील्ड करण्यासाठी आणि राखण्यासाठी जबाबदार आहात. हे तुम्ही तुमची कम्युनिटी सुरक्षित ठेवत असताना संभाषणाचे व्यवस्थापन करून साध्य कराल. कम्युनिटीमध्ये, प्रत्येक ग्रुपचा स्वतःचा ग्रुप ॲडमिन असतो आणि तो त्यांच्या ग्रुपच्या देखरेखीसाठी जबाबदार असतो. चांगल्या व्यवस्थापित कम्युनिटीमध्ये, कम्युनिटी आणि ग्रुप ॲडमिन्स सदस्यांशी आणि एकमेकांशी नियमितपणे संवाद साधतात आणि सर्वांना कम्युनिटीच्या नियमांचे पालन करण्याची आठवण करून देतात.

    WhatsApp वरील कम्युनिटीमधील कम्युनिटी स्तरावरील घोषणा सदस्यांना घोषणा ग्रुपमध्ये पाठवून तुम्ही वेळ वाचवू शकता. ग्रुप्सना एका कम्युनिटी छत्राखाली आणल्याने ग्रुप स्तरावर अनेक घोषणा करण्याची गरज नाहीशी होते. सुरुवातीपासूनच चांगली संस्कृती असावी ही अपेक्षा जपण्यासाठी तुमच्या कम्युनिटीचे नियम लवकर तयार करा आणि सदस्यांना त्याबद्दल कळवा. उत्कृष्ट नियम सदस्यांना इतरांशी सकारात्मक संवाद कशाप्रकारे साधावा आणि कम्युनिटीमध्ये योगदान कसे द्यावे हे स्पष्ट करतात. नियमांमुळे संघर्ष टाळण्यास आणि सदस्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास मदत होऊ शकते.

    तुमच्या कम्युनिटीची मार्गदर्शक तत्त्वे लिहिताना खालील नियम विचारात घ्या :

    • सहृदयी आणि सर्वसमावेशक वृत्तीचे व्हा. सर्वांना सन्मानाने वागवा.
    • द्वेषयुक्त भाषण किंवा दादागिरी करू नका. मानहानीकारक टिप्पण्या आणि वैयक्तिक हल्ले स्वीकारार्ह नाहीत.
    • कोणत्याही जाहिराती किंवा स्पॅम करू नका - स्वत:ची जाहिरात करण्यास आणि गैरलागू मेसेजेस पाठवण्यास अनुमती नाही.
    • प्रत्येकाच्या गोपनीयतेचा आदर करा - आमच्यासाठी परस्पर विश्वास मौल्यवान आहे. ग्रुप्समध्ये जे शेअर केले गेले आहे ते ग्रुपमध्येच राहिले पाहिजे.

    कम्युनिटीच्या वर्णनामध्ये नियमांचा समावेश करून ते घोषणा गटामध्ये पोस्ट करणे ही चांगली पद्धत आहे. सदस्यांनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांना कम्युनिटीमधून काढून टाकले जाऊ शकते याची आठवण करून द्या. ग्रुपच्या संभाषणांमध्ये कम्युनिटी नियमांचे पालन केले जात असण्याची खात्री करण्यासाठी तुमच्या ग्रुप ॲडमिन्ससोबत काम करणे देखील महत्त्वाचे आहे.

  • तुमची कम्युनिटी जसजशी वाढत जाईल, तसतशा तुमच्या जबाबदाऱ्याही वाढत जातील. एकाहून अधिक ग्रुप्स असलेल्या मोठ्या कम्युनिटीमध्ये, तुम्हाला वर्कलोड शेअर करण्यासाठी ॲडमिन्सच्या टीमची आवश्यकता भासू शकते. यामुळे प्रत्येकासाठी कामे आटोक्यात आहेत आणि कोणा एकाच व्यक्तीवर अवलंबून राहत नाहीत याची खात्री करण्यास मदत होते.

    तुम्ही इतर ग्रुप ॲडमिन्स किंवा कम्युनिटीच्या सदस्यांना २० पर्यंत कम्युनिटी ॲडमिनच्या भूमिका देऊ शकता. तुमच्या अ‍ॅडमिन टीममध्ये कोणाचा समावेश करावा हे ठरवताना पुढील गोष्टींचा विचार करा :

    • सदस्यांची संख्या, ग्रुप्स आणि ग्रुप्स ॲडमिन्स;
    • आवश्यक असलेल्या कम्युनिटी ॲडमिन्सची संख्या;
    • अनेक ग्रुप्सचे व्यवस्थापन करणारे ग्रुप ॲडमिन्स;
    • सक्रियपणे संभाषणात भाग घेणारे आणि चांगली निर्णयक्षमता प्रदर्शित करणारे ग्रुप ॲडमिन्स आणि सदस्य;
    • ॲडमिनची भूमिका उदा. संप्रेषणांचे लेखन, ग्रुप ॲडमिन्सशी जोडलेले राहणे, सदस्यत्वावर आणि जोडलेल्या ग्रुप्सवर लक्ष ठेवणे इत्यादी कामे पार पाडण्यास सक्षम असणारे सदस्य

    कम्युनिटी आणि ग्रुप ॲडमिन्स या दोन्हींसाठी एकमेकांशी संवाद साधता येईल आणि साहाय्य करता येईल असा ॲडमिन-ओन्ली ग्रुप स्थापन करा.

    तुमच्‍या ॲडमिन टीमच्या सदस्‍यांचे वर्कलोड आणि स्वास्थ्य व्‍यवस्‍थापित करण्‍यासाठी, सुरूवातीपासूनच तुमच्‍या सहभागाबद्दल विचार करणे आणि चर्चा करणे उपयुक्त ठरेल:

    • प्रत्येक ॲडमिनला आपला किती वेळ देता येईल?
    • प्रत्येक ॲडमिनला कोणती कामे आणि जबाबदाऱ्या नेमून दिल्या जाऊ शकतात?

    कम्युनिटी अॅडमिन्स कसे व्यवस्थापित करायचे

शिकणे चालू ठेवा

सुरक्षिततेची भावना आपल्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण आहे. सुरक्षा, गोपनीयता आणि सुरक्षिततेशी निगडित समस्या तुमच्या कम्युनिटीवर कसा परिणाम करतात आणि तुमच्या सदस्यांना सुरक्षित आणि कनेक्टेड कसे ठेवायचे ते समजून घ्या.

ओव्हरव्ह्यू वर परत या
लेख उपयुक्त होता का?
होयनाही
लेख उपयुक्त का नव्हता?
  • लेख गोंधळात टाकणारा होता
  • लेखामुळे माझ्या समस्येचे निराकरण झाले नाही
  • हा लेख मला किंवा माझ्या कम्युनिटीला लागू होत नाही
  • हे WhatsApp वर कसे करावे हे लेखात स्पष्ट करून सांगितलेले नाही
फीडबॅककरिता आभारी आहोत

पुढील

१०१: सुरक्षित कम्युनिटी बील्ड करणे
ट्युटोरिअल पहा
पुन्हा टॉपवर जा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप