WhatsApp वर नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा तुमचे ग्रुप्स WhatsApp वरील कम्युनिटींमध्ये जोडताना लक्षात ठेवण्यायोग्य काही मुख्य गोष्टी.
रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी तुमच्या ॲडमिन आणि सदस्यांना सक्षम करा आणि सहयोग करा.
विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कम्युनिटी वाढवण्यासाठी WhatsApp कशा प्रकारे वापरतात ते पहा.
लोक माहिती मिळवण्यासाठी, समान विचारधारेच्या लोकांना भेटण्यासाठी, प्रेरणा मिळवण्यासाठी आणि एक समान ध्येय साध्य करण्यासाठी कम्युनिटीजमध्ये सामील होतात. तुमच्या WhatsApp कम्युनिटीची वृद्धी व्हावी याकरिता, तुम्ही तुमच्या सदस्यांच्या गरजा पूर्ण करणारी आणि अर्थपूर्ण व घनिष्ट कनेक्शन सक्षम करणारी एक जागा तयार करणे आवश्यक आहे. माहिती आणि मजकूर कम्युनिकेट करताना क्रिएटिव्ह व्हा आणि सदस्यांना सहभाग घेऊन संवाद साधण्यासाठी व एक निकोप, सकारात्मक आणि सक्रिय कम्युनिटी बनवण्यासाठी प्रोत्साहन द्या.


"अनेक ग्रुप्स तयार करू शकणे आणि त्यांना एकाच ठिकाणी व्यवस्थापित करणे यामुळे अधिक वैयक्तिक स्वरूप मिळते आणि खरोखरच आमच्या सदस्यांमध्ये अधिक अर्थपूर्ण संबंध तयार करणे शक्य झाले - त्यांना एकमेकांशी कनेक्ट करणे आणि सहाय्यात्मक मैत्रीस प्रारित करणे, जे आमचे संपूर्ण ध्येय आहे."
- Bruna (आंतरराष्ट्रीय महिला बर्लिन)
सदस्य सक्रियपणे सहभागी झाल्याने कम्युनिटीजची भरभराट होते. स्पॅम किंवा अनावश्यक असलेल्या माहितीचा भडीमार करून नव्हे तर, तुमच्या सदस्यांनी योग्य संतुलन साधून नियमित, अर्थपूर्ण संवाद करून ते कसे कनेक्ट करू शकतात आणि इंटरॅक्ट करू शकतात त्यास तुम्ही अॅडमिन म्हणून प्रभावित करू शकता.
तुमच्या कम्युनिटीची वृद्धी करण्यासाठी आणि कम्युनिटीला गुंतवून ठेवण्यासाठी काही कल्पना पाहूया:
एक स्वागतार्ह आणि सकारात्मक कम्युनिटी नवीन सदस्यांना सामील होण्याचे प्रोत्साहन देते आणि सर्वांसाठी सकारात्मक आणि निकोप वातावरण निर्माण करते.
तुम्ही नवीन सदस्यांचे स्वागत कसे करू इच्छिता याबद्दल विचार करा. कम्युनिटी किंवा ग्रुप अॅडमिनद्वारे झालेले वैयक्तिक स्वागत खूपच प्रेरणादायी असू शकते. कम्युनिटीचा उद्देश्य आणि नियम याविषयीची माहिती देऊन तुम्ही त्यांना ग्रुपमध्ये वावरण्यास, सुरक्षित वाटण्यास आणि आत्मविश्वासाने सहभागी होण्यास मदत करू शकता.
जसजसे नवीन सदस्य सामील होत जातील तसे, तुमचे कम्युनिटी आणि ग्रुप अॅडमिन्स समान स्वारस्य असलेल्या लोकांना जोडून त्यांना गुंतवून ठेवण्यात देखील मदत करू शकतात. कालांतराने या नवीन सदस्यांना तुमच्या ग्रुपमध्येच अजून एखादा ग्रुप तयार करावासा वाटू शकेल.
ग्रुप कसा तयार करावा आणि त्यामध्ये लोकांना कसे आमंत्रित करावे
सहभागाला प्रतिसाद देण्यासाठी कम्युनिटी आणि ग्रुप अॅडमिन्स उपस्थित, मैत्रीपूर्ण आणि संपर्क साधण्यासाठी उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. सौहार्दपूर्ण आणि परस्परसंवादी राहिल्याने सदस्यांना तुम्हाला नीट ओळखता येते आणि विश्वास संपादन करण्यास मदत होते. तुम्ही हा विश्वास निर्माण केल्यावर, सदस्यांना तुमच्याकडे त्यांचे प्रश्न घेऊन येणे किंवा ग्रुप्सच्या संभाषणांमध्ये सहभाग घेणे अधिक सोपे जाते.
काय शेअर करावे किंवा कशाविषयी बोलावे यासाठीच्या विषयांबद्दल काही सदस्यांना मदत लागू शकते. सोपे, सुसंबद्ध, सविस्तर उत्तरे देता येतील असे प्रश्न विचारणे हा प्रतिसाद मिळवण्याचा आणि सहभाग वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे. ग्रुपमधील सदस्य प्रतिसाद देऊ लागल्यावर त्यांना थेट प्रत्युत्तर द्या, जेणेकरून त्यांना हे समजेल की त्यांच्या मतांना महत्त्व दिले जाते.
ग्रुप्समध्ये सदस्यांना गुंतवून ठेवून सहभाग घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनावश्यक आणि अस्पष्ट मेसेजेस कमी करण्याचा प्रयत्न करा. घोषणा स्पष्ट, सुसंबद्ध आणि योग्य वेळी पाठवल्या जात असल्याची खात्री करा. ग्रुपमधील संभाषणे सुव्यवस्थित आणि विषयाला धरून रहावीत यासाठी सदस्यांना 'प्रत्युत्तर' फंक्शन वापरण्याची नियमितपणे आठवण करा.
कोणत्या प्रकारचा मजकूर शेअर केला जातो हे तुमच्या कम्युनिटीच्या उद्देशावर अवलंबून असते. सदस्यांना तुमच्या कम्युनिटीमधून काय मिळवण्याची अपेक्षा आहे याचा विचार करा. जर त्यांचा उद्देश एखाद्या उपक्रमाच्या बाबतीत माहिती शेअर करणे हा असेल, तर त्या विषयावरील नियमित कटेन्ट उपयुक्त ठरेल. जर त्यांना सामाजिक साहाय्य अपेक्षित असेल, तर अॅडमिन कने्ट करण्यासाठी संसाधने किंवा संधी शेअर करू शकतात.
तुमच्या कम्युनिटी आणि ग्रुप अॅडमिन्ससह क्रिएटिव्ह व्हा. मजकूर शेअर करताना भिन्न स्वरूपांचा वापर करा जसे की टेक्स्ट, व्हिडिओ, इमेजेस, व्हॉईस नोट्स, GIF आणि इतर बरेच काही. शेड्यूल केलेले ग्रुप कॉल्सदेखील परस्परसंवादास प्रेरणा देण्यासाठी प्रभावी ठरू शकतात आणि ते सतत मेसेज पाठवण्यापेक्षा एक स्वागतार्ह बदलू असू शकतात.
ग्रुप्स त्यांच्या उद्देशांना धरून आहेत याची सुनिश्चिती करणे महत्त्वाचे आहे. कालांतराने, त्यांची संख्या वाढू शकते आणि त्यामुळे सर्वांना समान कंटेन्ट सुमर्पक वाटणे कठीण होऊ शकते. अधिक टार्गेट केलेल्या हितांसह ग्रुप्स लहान करण्यामुळे संभाषणे सखोल होऊ शकतात आणि विशिष्ट ग्रुप्समध्ये कोणती महिती ठेवावी आणि प्रत्येकासाठी काय प्रसारित करावे याबद्दल निर्णय घेण्यात तुम्हाला मदत होऊ शकते.
कॉलच्या लिंक्स कशा तयार आणि शेअर कराव्या
व्हॉईस मेसेजेस कसे पाठवावे
नियमित अभिप्राय मिळवणे ही चांगली पद्धत आहे. सदस्यांना कोणत्या प्रकारची माहिती उपयुक्त वाटते किंवा वाटत नाही आणि त्यांना अजून काय पहाणे आवडेल हे विचारण्यासाठी ग्रुप अॅडमिन्ससोबत कार्य करा.
सहभाग कमी होत आहे असे तुम्हाला जाणवल्यास त्यामागची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे. ते कदाचित नकारात्मक आणि अपमानास्पद कमेंटमुळे, चुकीची माहिती पसरवल्यामुळे किंवा अत्याधिक माहिती दिल्यामुळे असू शकते का?
काही सदस्य सर्व गोष्टींवर कमेंट करतात किंवा प्रतिसाद देतात पण काहींना चर्चेत स्वतः सहभागी न होता केवळ निरीक्षण करायला आवडते. इतरांएवढ्या सक्रियपणे चर्चेत सहभाग न घेणार्या सदस्यांनादेखील तुमच्या कम्युनिटीचा फायदा होत आहे हे लक्षात असू द्या.
सदस्य सक्रियपणे कम्युनिटी सोडत असतील तर, त्यांना ते का सोडत आहे हे विचारणे चांगली कल्पना आहे परंतु जे अभिप्राय देऊ इच्छित नाही किंवा आणखी पुढे एंगेज होऊ शकत नाही त्यांचा कृपया आदर ठेवा.
सीमा प्रस्थापित केल्याने योग्य वर्तन आणि कंटेन्ट यासाठीचे मार्गदर्शन मिळते आणि मर्यादा निश्चित करण्यास साहाय्य होते. चुकीची माहिती, गुंडगिरी आणि इतर प्रकारची हानी कशी हाताळावी आणि प्रतिबंधित करावी हे जाणून घ्या.