आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा

कोरोना व्हायरसच्या (COVID-19) सार्वत्रिक साथीमध्ये एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp ची कशी मदत करू शकते ते पहा

आरोग्य सेवा व्यावसायिक

सध्या समाजात अनिश्चिततेचे, एकमेकांपासून विलगीकरणात राहण्याचे जे वातावरण आहे, त्यामध्ये तुमच्या रुग्णांच्या आणि सहकाऱ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp चा वापर करा — लोक त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहण्यासाठी हेच टूल वापरत आहेत.

तुमच्या ग्राहकांशी संपर्क साधत असताना कृपया WhatsApp चा वापर जबाबदारीने करा. फक्त तुम्हाला माहीत असलेल्या आणि ज्यांना तुमच्याकडून मेसेजेस प्राप्त करायचे आहेत अशा वापरकर्त्यांशीच संवाद साधा, ग्राहकांना तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह करण्यास सांगा आणि ग्रुप्समध्ये स्वयंचलित किंवा प्रचारात्मक मेसेजेस पाठवणे टाळा. या सोप्या सर्वोत्तम पद्धतींंना फॉलो न केल्याने इतर वापरकर्त्यांकडून तक्रारी केल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे खाते बॅन केले जाण्याची शक्यता आहे.

बहुविध प्रकारच्या प्रश्नांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करण्यासाठी, तसेच कामाचे तास इत्यादी उपयुक्त माहिती देण्यासाठी आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे स्टोअर करून ठेवण्यासाठी, तुम्ही WhatsApp Business डाउनलोड करावे असे आम्ही सुचवतो. हे पूर्णपणे मोफत आहे. WhatsApp Business ॲप कसे वापरायचे याविषयी पायरीपायरीने मार्गदर्शन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा . तुम्हाला तुमचे खाते WhatsApp Messenger वरून WhatsApp Business ॲपवर हलवणे आवश्यक असल्यास, येथे क्लिक करा.

तुमच्या फोनवर डाउनलोड करा

ANDROIDIPHONE

तुमच्या रुग्णांच्या संपर्कात राहा

तुमच्याकडे रुग्णांचा फोन नंबर नसताना, रुग्णांना तुमच्याशी खाजगी WhatsApp चॅट सुरू करता यावा म्हणून शॉर्ट लिंक तयार करा. ही लिंक ईमेलद्वारे, तुमच्या Facebook पेजवर किंवा सार्वजनिक नसलेल्या इतर चॅनेलवर शेअर करा.

उपयुक्त सूचना सहजपणे दिसू द्या

रुग्ण तुमच्याशी संपर्क साधतील तेव्हा त्यांना उपयुक्त माहिती आणि संसाधने लगेच मिळावी यासाठी कस्टमाइझ केलेले स्वागत संदेश तयार करा.

अचूक माहिती वेळेवर शेअर करा

एखादा खाजगी मेसेज एकाचवेळी अनेक संपर्कांना पाठवायचा असल्यास ब्रॉडकास्ट लिस्ट वापरा. ज्या संपर्कांनी तुम्हाला त्यांच्या संपर्क यादीत जोडले आहे, त्याच संपर्कांना तुमचा ब्रॉडकास्ट मेसेज मिळू शकेल.

रिमोट कॉन्फरन्सेस आयोजित करा

एखाद्या रुग्णाशी किंवा सहकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट होणे कठीण असल्यास, त्यांच्याशी संपर्क साधण्याकरिता एन्क्रिप्ट केलेले व्हिडिओ आणि व्हिडिओ कॉल्स वापरा.*

वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना तत्परतेने उत्तरे द्या

रुग्णांच्या प्रश्नांना तत्परतेने उत्तरे देण्यासाठी तुम्ही जे मेसेजेस वारंवार पाठवता ते सेव्ह करा आणि त्यांचा पुनरुपयोग करा.

तुमच्या कम्युनिटीला माहितीवर आधारित शिक्षण द्या

तुम्ही स्टेटस, मधून मजकूर, फोटो आणि व्हिडिओ अपडेट्स पोस्ट करू शकता. स्वच्छतेबद्दलच्या सर्वोत्तम पद्धती तसेच व्हायरसचा प्रसार रोखण्याचे इतर मार्ग याबद्दलच्या उपयुक्त सूचना स्टेटसमधून शेअर करा.

तुमच्या व्यवसायाचे सध्याचे कामाचे तास शेअर करा

तुम्ही तुमचे कामाचे तास स्थानिक भागातील आवश्यकतेनुसार बदलले असल्यास तुम्ही केव्हा उपलब्ध, असाल हे तुमच्या रुग्णांना कळेल याची खात्री करा.

किती वेळात प्रतिसाद मिळू शकेल हे आधीच सांगून ठेवा

तुम्हाला उत्तर द्यायला वेळ मिळत नसेल तेव्हा, ऑटोमॅटिक व्यस्तता संदेशच्या साहाय्याने, तुम्ही केव्हा उत्तर देऊ शकाल हे रुग्णांना कळवा.

तुमच्या आरोग्य सेवा टीमच्या संपर्कात राहा

व्हायरसच्या प्रसाराबद्दलच्या ताज्या घडामोडी शेअर करण्यासाठी ग्रुप्स आणि ग्रुप व्हिडिओ कॉल्स वापरा.

*WhatsApp चा कोणत्याही प्रकारचा वापर आरोग्य सेवाविषयक डेटाच्या गोपनीयतेशी संबंधित कायदे तसेच सुरक्षाविषयक कायदे यांसह संबंधित कायद्यांचे पालन करून केला जात आहे याची खबरदारी घेणे ही प्रत्येक WhatsApp वापरकर्त्याची जबाबदारी आहे. WhatsApp आरोग्य सेवा उपलब्ध करत नाही किंवा त्या देऊ करत नाही. तुम्ही प्रदान करत असणाऱ्या आरोग्य सेवांशी WhatsApp संबंधित आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. WhatsApp हा प्रत्यक्ष भेट घेऊन उपचार करण्यास किंवा ज्या आजारांसाठी तात्काळ आरोग्य उपचार लागतील अशा आजारांच्या उपचारांसाठी पर्याय ठरू शकत नाही आणि त्याचा उपयोग आरोग्यविषयक उपचारांसाठी वापरले जाणारे साधन म्हणून केला जाऊ नये.

तुम्हाला WhatsApp कोरोना व्हायरस मदत केंद्राविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, शी संपर्क साधा.

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप