आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा

कोरोना व्हायरसच्या (COVID-19) जागतिक साथीमध्ये एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp ची कशी मदत शकते

स्थानिक बिझनेस

तुम्ही समाजाचा एक भाग आहात आणि सध्या समाजात अनिश्चिततेचे, एकमेकांशी संपर्क टाळण्याचे जे वातावरण आहे, त्यामध्ये व्यवसाय चालवणे अधिक कठीण होऊ शकते. WhatsApp वरून तुमच्या ग्राहकांच्या संपर्कात राहा — लोक त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहण्यासाठी हेच टूल वापरत आहेत.

तुमच्या ग्राहकांशी संपर्क साधत असताना कृपया WhatsApp चा वापर जबाबदारीने करा. फक्त तुम्हाला माहीत असलेल्या आणि ज्यांना तुमच्याकडून मेसेजेस प्राप्त करायचे आहेत अशा वापरकर्त्यांशीच संवाद साधा. ग्राहकांना तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह करण्यास सांगा आणि ग्रुप्समध्ये ऑटोमेटेड किंवा प्रचारात्मक मेसेजेस पाठवणे टाळा. या सोप्या व सर्वोत्तम पद्धतींंचा वापर न केल्यामुळे इतर वापरकर्त्यांकडून तक्रारी केल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे खाते बॅन केले जाऊ शकते.

तुमच्या व्यवसायाशी निगडीत प्रश्नांची उत्तरे लवकर मिळावीत यासाठी ती माहिती तुमच्या बिझनेस प्रोफाइल मध्येच समाविष्ट करा आणि तुमच्या सेवांविषयीची माहिती कॅटलॉग मध्ये द्या. यासाठी तुम्ही पूर्णपणे मोफत असलेले WhatsApp Business ॲप डाउनलोड करावे असे आम्ही सुचवतो. WhatsApp Business ॲप कसे वापरायचे याविषयी क्रमाक्रमाने मार्गदर्शन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा . तुम्हाला तुमचे खाते WhatsApp Messenger वरून WhatsApp Business ॲपवर हलवणे आवश्यक असल्यास, येथे क्लिक करा.

तुमच्या फोनवर डाउनलोड करा

ANDROIDIPHONE

तुमच्या ग्राहकांच्या संपर्कात राहा

ग्राहकांना तुमच्याशी WhatsApp चॅट सुरू करता यावे यासाठी शॉर्ट लिंक तयार करा. ही लिंक ईमेलमधून, तुमच्या वेबसाइटवर, तुमच्या Facebook पेजवर आणि इतर वारंवार वापरल्या जाणाऱ्या चॅनेल्सवर शेअर करा.

तुमच्या बिझनेसचे सध्याचे कामाचे तास शेअर करा

तुमच्या कामाच्या तासांमध्ये बदल झाल्यास ते ग्राहकांना कळेल याची खबरदारी घ्या. तुमचा व्यवसाय कोणत्या दिवशी आणि किती वेळ सुरू असतो हे दाखवण्यासाठी तुमच्या बिझनेस प्रोफाइलचा वापर करा.

तुमच्या उत्पादनांच्या उपलब्धतेबद्दल नियमितपणे अपडेट्स देत राहा

सध्या काय उपलब्ध आहे याची तात्काळ माहिती ग्राहकांना द्या. तुमच्या महत्त्वाच्या ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी ग्रुप्सचा वापर करा आणि कोणती उत्पादने स्टॉकमध्ये आहेत हे ग्राहकांना कळावे म्हणून तुमचा कॅटलॉग अपडेट करा.

दुरून सल्लामसलत करण्याची सोय उपलब्ध करून द्या

ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि त्यांना व्यक्तिश: मिळत होती तशीच सेवा देण्यासाठी एन्क्रिप्टेड व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल्स यांचा वापर करा.

पिकअप्स आणि डिलिव्हरी अधिक कार्यक्षम बनवा

लोक तुमच्या व्यवसायाला प्रत्यक्ष भेट देऊ शकत नसल्याने, स्टोअरमधून पिकअप्स आणि डिलिव्हरीज मध्ये वाढ होऊ शकेल. ज्या ठिकाणी डिलिव्हरी द्यायची आहे त्या पत्त्याच्या नजीक पोहोचल्यावर लाईव्ह लोकेशन फीचर सुरू करा. या फीचरमुळे ग्राहकाला तुमचे नेमके स्थान कळण्यास आणि जलद आणि सुलभ देवाणघेवाण होण्यास मदत होते.

ग्राहकांना तुमच्या स्टोअरची सैर घडवून आणा

ग्राहक तुमच्या स्टोअरला भेट देतात तेव्हा प्रत्येक वेळी खूष होतात असा तुमचा नेहमीचा अनुभव आहे का? त्यांना स्टेटस अपडेट मधून स्टोअरची आभासी सैर घडवा.

तुमच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहा

दूरवरून तुमच्या टीमच्या संपर्कात राहण्यासाठी ग्रुप्स आणि ग्रुप व्हिडिओ कॉल्स वापरा.

तुम्हाला WhatsApp कोरोना व्हायरस मदत केंद्राविषयी कोणतेही प्रश्न असल्यास, आमच्याशी संपर्क साधा.

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप