अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही WhatsApp यासाठी तयार केले आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांशी संपर्कात राहू शकता, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी महत्वाची माहिती शेअर करू शकता, विभक्त झालेल्या कटुंबीयांना एकत्र आणू शकता किंवा तुमचे जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करू शकता. तुमचे काही अत्यंत खाजगी क्षण हे WhatsApp द्वारे शेअर केले जातात आणि त्यासाठीच आम्ही आमच्या अॅप मध्ये एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कूटबद्धीकरण विकसित केलेले आहे. जेव्हा एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले असते तेव्हा तुमचे संदेश, फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेज, डॉक्युमेंट्स आणि कॉल्स हे एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडण्यापासून सुरक्षित ठेवले जातात.
WhatsApp चे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच संपूर्ण कूटबद्धीकरण हे तेव्हा उपलब्ध होईल जेव्हा तुम्ही आणि तुम्हाला संदेश पाठविणारे सर्व संपर्क अॅप ची नवीन आवृत्ती वापरत असतील. अनेक मेसेजिंग अॅप्स हे फक्त तुम्ही आणि ते यांच्यातीलच संदेश कूटबद्ध करतात परंतु WhatsApp चे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन याची हमी देते की फक्त तुम्ही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही संभाषण साधत आहात तेच फक्त पाठविलेला मजकूर वाचू शकतात, यांव्यतिरिक्त इतर कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही. हे शक्य होते कारण तुमचे संदेश हे एका कुलुपाने सुरक्षित केलेले असतात आणि फक्त प्राप्तकर्त्याकडेच त्याची विशिष्ट किल्ली असते ज्यामुळे तो ते कुलुप उघडून ते वाचू शकतो. अधिक सुरक्षेसाठी, तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक संदेशाला स्वतःची अशी एक स्वतंत्र कुलूप आणि किल्ली असते. हे सर्व ऑटोमॅटिकली होते : तुमचे संदेश सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला कोणतेही सेटिंग्ज करावे लागत नाहीत अथवा एखादे सिक्रेट चॅट म्हणजेच गुप्त गप्पा सेट कराव्या लागत नाहीत.
WhatsApp कॉलिंग वापरून तुम्ही आता तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबीयांशी गप्पा मारू शकता अगदी ते दुसऱ्या देशात असले तरीही. जसे तुमचे संदेश एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले आहेत त्याप्रमाणेच तुमचे WhatsApp कॉल्स देखील केलेले आहेत याचा अर्थ WhatsApp आणि तृतीय पक्ष त्यांना ऐकू शकत नाही.
तुमचे संदेश हे तुमच्याच हातात राहणे महत्वाचे आहे. म्हणूनच WhatsApp तुमचे संदेश एकदा का ते पोहोचवले की ते आम्ही आमच्या सर्व्हर वर साठवत नाही, आणि एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन असल्याने WhatsApp आणि तृतीय पक्ष त्यांना वाचू शकत नाही.
WhatsApp तुम्हाला तुमचे संदेश आणि कॉल्स एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कूटबद्ध केलेले आहेत का ते पाहण्याची अनुमती देते. तुमच्या संपर्क माहितीच्या किंवा गट माहितीच्या इंडिकेटर मध्ये बघा.
WhatsApp च्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच संपूर्ण कूटबद्धीकरणाबद्दल अधिक सविस्तर स्पष्टीकरण येथे वाचा. हे Open Whisper Systems यांच्या कोलॅबोरेशन मध्ये डेव्हलप केलेले आहे.