पहिल्या दिवसापासूनच, WhatsApp च्या निर्मितीचा उद्देशच मुळात तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहता यावे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात महत्त्वपूर्ण माहिती शेअर करता यावी, दुरावलेल्या कुटुंबांना जवळ आणता यावे किंवा आयुष्य समृद्ध करावे हा होता. तुम्ही तुमचे अत्यंत खाजगी क्षणही WhatsApp वर शेअर करत असता, त्यामुळेच आम्ही आमच्या ॲपला एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देऊ केलेली आहे. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा लाभलेले मेसेजेस, फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेजेस, डॉक्युमेंट्स, स्टेटस अपडेट्स आणि कॉल्स चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडण्यापासून सुरक्षित ठेवले जातात.
तुम्ही WhatsApp Messenger वापरून दुसऱ्या व्यक्तीशी चॅट करता तेव्हा तुमच्या संभाषणांना सुरक्षित करण्यासाठी WhatsApp चे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन वापरले जाते. तुम्ही ज्या व्यक्तीशी संभाषण करत आहात ती व्यक्ती आणि खुद्द तुम्ही, हेच फक्त ते संभाषण वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही - याची खात्री एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन करते. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये तुमचे मेसेजेस एका कुलूपाने सुरक्षित केले जातात आणि हे मेसेजेस उघडून वाचण्यासाठी लागणारी विशेष किल्ली फक्त तुमच्याकडे आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीकडे असते. हे सर्व आपोआप होते. तुमचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही खास सेटिंग किंवा कोणतेही गुप्त चॅट सुरू करावे लागत नाही.
तुमच्या डिव्हाइसमधून मेसेज जाण्यापूर्वी मेसेज सुरक्षित करणाऱ्या सिग्नल एन्क्रिप्शन प्रोटोकॉलने प्रत्येक WhatsApp मेसेजला सुरक्षित केले जाते. तुम्ही एखाद्या WhatsApp Business खात्यास मेसेज करता तेव्हा तुमचा मेसेज त्या बिझनेसने निवडलेल्या ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचवला जातो.
WhatsApp यासाठी WhatsApp Business ॲप वापरणाऱ्या किंवा मेसेजेस व्यवस्थापित करण्यासाठी व स्टोअर करण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची मदत घेणाऱ्या बिझनेससोबतची चॅट्स विचारात घेते. बिझनेसला मेसेज मिळाल्यावर त्या मेसेजला त्या बिझनेसची स्वतःची गोपनीयता धोरणे लागू होतात. तो बिझनेस या मेसेजेसवर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना किंवा विक्रेत्यांना नियुक्त करू शकतो.
काही बिझनेसेस1 ग्राहकांचे मेसेजेस स्टोअर करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी WhatsApp ची पालक कंपनी असलेल्या Meta ची निवड करू शकतात. बिझनेसच्या गोपनीयता शर्तींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या बिझनेसशी कधीही संपर्क साधू शकता.
WhatsApp वरील 'पेमेंट्स' हे फीचर काही निवडक देशांमध्येच उपलब्ध आहे आणि ते एका बॅंक खात्यामधून दुसऱ्या बॅंक खात्यात WhatsApp ने पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. कार्डचा नंबर आणि बॅंकेशी संबंधित नंबर्स हे एन्क्रिप्ट केलेल्या आणि उच्च सुरक्षा लाभलेल्या नेटवर्कवर स्टोअर केलेले असतात. मात्र, बॅंकांना पेमेंट्सशी संबंधित व्यवहारावर प्रक्रिया करण्यासाठी पेमेंट्सशी संबंधित माहिती लागते. त्यामुळे, ही पेमेंट्स एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेली नसतात.
तुमच्या मेसेजचे काय होते हे तुम्हाला कळावे याची दक्षता WhatsApp घेते. एखाद्या व्यक्तीने किंवा बिझनेसने तुम्हाला मेसेज करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना थेट चॅटमधूनच ब्लॉक करू शकता किंवा तुमच्या संपर्क यादीतून हटवू शकता. तुमचे मेसेजेस कसे हाताळले जातात आणि योग्य निर्णय घेता यावे यासाठी तुमच्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे तुम्हाला समजावे याची आम्ही खबरदारी घेतो.
WhatsApp कॉलिंगमुळे तुम्ही परदेशात असलेल्या मित्रमैत्रीणींशी आणि कुटुंबीयांशी देखील खाजगीरित्या बोलू शकता.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमुळे तुमचे मेसेजेस इच्छित व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर WhatsApp सर्व्हर्सवर सेव्ह न होता तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर होतात.
तुम्ही पाठवलेले मेसेजेस आणि केलेले कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत का हे WhatsApp तुम्हाला स्वत:ला तपासू देते. तुमच्या चॅटमधील, संपर्क माहितीमधील किंवा बिझनेसच्या माहितीमधील चिन्हांवरून तुम्हाला ते सहज कळते.
WhatsApp ने Open Whisper Systems च्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन बद्दलची तपशीलवार तांत्रिक माहिती वाचा.
नियमित सुरक्षा अपडेट्स मिळवण्यासाठी सुरक्षाविषयक सल्ला पहा.
1 २०२१ मध्ये.