WhatsApp सुरक्षितता विषयी

खाजगी संदेशांचे मूलभूत स्वरूप लक्षात घेता तुमची गोपनीयता आणि सुरक्षितता ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तुमचे संदेश आणि कॉल्स हे एन्ड टू एन्क्रिप्शनने अर्थात संपूर्णपणे कूटबद्ध करून सुरक्षित केलेले असतात त्यामुळे ते कोणीही वाचू अथवा ऐकू शकत नाही, अगदी WhatsApp देखील नाही.

WhatsApp वर सुरक्षित राहण्यासाठी आम्ही अजून काही सुविधा विकसित केल्या आहेत.

तुमचे गोपनीयता सेटिंग्ज नियंत्रित करा

तुमचा प्रोफाइल फोटो, अखेरचे पाहिलेले आणि माझ्याबद्दल असे सेट करा की ते सर्वांसाठी, केवळ संपर्कांसाठी किंवा कोणासाठीही नाही हे तुम्हाला नियंत्रित करता येईल.

अनावश्यक वापरकर्त्यांना ब्लॉक करा

जर कोणी विनाकारण परस्पर चॅट मधून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना थांबवा.

खाते माहितीसाठी विचारणा करा

तुमची WhatsApp खाते माहिती आणि सेटिंग्जचा रिपोर्ट मिळवा .

चॅट मधील संदेश साफ करा

वैयक्तिक किंवा गटगप्पांमधील गप्पा किंवा सर्वच गप्पा एकदम हटवा.

पोचपावत्या बंद ठेवा

तुमच्या संपर्कांनी तुम्हाला पाठविलेला संदेश तुम्ही वाचला आहे की नाही, हे त्यांना कळावे का ते नियंत्रित करा.

स्पॅम रिपोर्ट करा आणि हटवा

अॅप मधून वायफळ आणि आक्षेपार्ह संदेश रिपोर्ट करा.

गट सोडा

तुम्हाला हवे तेव्हा कोणत्याही वेळी गट सोडा.

द्वि-स्तर पडताळणी सक्षम करा

अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सहा आकडी सुरक्षितता पिन निर्माण करा.

अधिक जाणून घ्या

वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया ही मदतपुस्तिका वाचा.