मेसेज प्रायव्हेटली
तुमची गोपनीयता आमचे प्राधान्य आहे. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह तुम्ही याची खात्री बाळगू शकता की तुमचे खाजगी मेसेजेस केवळ तुम्ही आणि तुम्ही ते पाठवलेली व्यक्ती यांदरम्यान राहतात.

तुमची गोपनीयता आमचे प्राधान्य आहे. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह तुम्ही याची खात्री बाळगू शकता की तुमचे खाजगी मेसेजेस केवळ तुम्ही आणि तुम्ही ते पाठवलेली व्यक्ती यांदरम्यान राहतात.
मेसेजेस आणि कॉल तुमच्यापर्यंतच राहतात. इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील ते वाचू किंवा ऐकू शकत नाही.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनच्या पलीकडे जाऊनही आम्ही तुमच्या संभाषणांना अधिक स्तरांनी सुरक्षित करतो.
तुम्ही काय शेअर करता, तुमची ऑनलाइन उपस्थिती, किंवा तुमच्याशी कोण बोलू शकते, याची निवड तुम्ही करता.
घुसखोराच्या दोन पावले पुढे रहा. तुमचा फोन नंबर वापरू पाहणार्या हॅकर्स आणि घोटाळेबाजांपासून तुमचे खाते सुरक्षित ठेवा.
डिसॲपिअरिंग मेसेजेससह, पाठवलेले मेसेजेस नाहीसे होण्यासाठी सेट अप करून तुम्ही कोणते मेसेजेस किती काळ राहतील याचे नियंत्रण करू शकता.
अनावश्यक चॅटना दूर ठेवा. तुम्हाला नको असलेल्या व्यक्तीकडून मेसेजेस प्राप्त होत असल्यास तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता आणि तुम्हाला त्यापुढे त्यांचे मेसेजेस किंवा कॉल प्राप्त न होण्याची खबरदारी WhatsApp घेते.
तुमचे ऑनलाइन बॅकअप खाजगी ठेवा. तुमच्या iCloud किंवा Google Drive वर सेव्ह केलेल्या मेसेजेसना देखील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करण्यासाठी एन्क्रिप्शनने सुरक्षित बॅकअप चालू करा.
ज्यांनी पाहावे असे तुम्हाला वाटते त्यांनाच निवडा. तुम्ही ऑनलाइन असताना, आणि शेवटचे WhatsApp केव्हा वापरले हे कोण पाहू शकते हे निवडण्यासाठी तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज कस्टमाइझ करू शकता.