तुमच्या मित्रांसोबत भेटण्यासाठी सहजपणे समन्वय साधण्यापासून ते ग्रुप चॅटमध्ये शेअर करण्याकरिता इमेज तयार करण्यापर्यंत, Meta AI कशाहीबाबत मदत मिळवणे सोपे करते, हे सर्व WhatsApp च्या सुरक्षा आणि गोपनीयतेसह करता येते.
फीचर कदाचित सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नसतील. येथे उपलब्धतेबद्दल अधिक जाणून घ्या.
तुम्हाला मजकूर किंवा व्हॉइसद्वारे एखादे गणिताचे उदाहरण सोडवायचे असेल, फोटो संपादित करायचा असेल किंवा ज्यावर ग्रुपमधील सर्वजण सहमत होतील असे एखादे रेस्टॉरंट शोधायचे असेल, तर Meta AI ची मदत घ्या.
तुमचा ग्रप आयकॉन म्हणून वापरण्यासाठी, तुमच्या व्हिडिओ कॉलसाठी पार्श्वभूमी सेट करण्याकरिता किंवा चॅटमध्ये पाठवण्यासाठी तुमचे फोटो संपादित करण्याकरिता किंवा AI वापरून जनरेट केलेल्या नवीन इमेज तयार करण्यासाठी तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणा.
न वाचलेले मेसेज जमा होण्यास सुरुवात होते, तेव्हा Meta AI त्यांचा सारांश करण्यासाठी जलदपणे मदत करते त्यामुळे तुम्ही परत संभाषणावर येऊ शकता. Meta AI ला खाजगी प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे तुमच्या मेसेजवर प्रक्रिया करता येते आणि त्यावेळी Meta किंवा WhatsApp ते वाचू शकत नाहीत.
WhatsApp द्वारे उपलब्ध असलेल्या AI अनुभवांचा वापर तुम्ही कसा करता ते तुमच्या नियंत्रणात आहे. नेहमीप्रमाणेच, तुमचे वैयक्तिक मेसेज आणि कॉल एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात. तुमचे वैयक्तिक मेसेज वापरणार्या फीचरसाठी, खाजगी प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे Meta AI ला प्रतिसाद तयार करता येतो आणि त्यावेळी Meta किंवा WhatsApp तुमचे मेसेज वाचू शकत नाही.
Meta AI मदत करण्यास तयार आहे आणि ते वापरण्याचे अनेक मार्ग आहेत—तुम्ही थेट चॅटमध्ये विचारता किंवा WhatsApp मधील इतर AI अनुभव एक्स्लोर करता.
जाणून घेण्यासाठी, तयार आणि एक्सप्लोर करण्यासाठी Meta AI सोबत चॅट करा. तुमचे पुढील सुट्टीचे डेस्टिनेशन शोधण्यापासून ते योग्य शब्दांमध्ये एखादा मेसेज लिहिण्यापर्यंत, Meta AI मदत करू शकते.
तुम्ही जी कल्पना करू शकता ते तयार करण्यासाठी Meta AI वापरा, सेल्फी अपलोड करा आणि कल्पना करा की तुम्ही एखाद्या परिस्थितीमध्ये आहात आणि परिणाम तुमच्या ग्रुप चॅटमध्ये शेअर करा.
तुम्हाला तुमचा फोटो जसा हवा अगदी तसा मिळवा. Meta AI ला नवीन पार्श्वभूमी जोडण्यास, एखादे ऑब्जेक्ट काढण्यास, एखादे इलस्ट्रेशन बनवण्यास आणि बरेच काही करण्यास सांगा.
तुम्हाला माहीत नसलेल्या एखाद्या रोपट्याचा फोटो तुम्ही घेत असाल किंवा गणिताची एखादी संकल्पना समजून घेण्यात मदत हवी असेल, तर तुमच्या फोटोंमध्ये काय आहे ते जाणून घेण्यासाठी Meta AI वापरा.