जेथे संभाषणे व्यक्त करणारी, मजेदार व पूर्णपणे तुम्हाला हवी तशी असू शकतात असे एक ठिकाण. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन असलेल्या कोणत्याही डिव्हाइसवरून मेसेज करणे, जेणेकरून तुमचे वैयक्तिक मेसेज सुरक्षित राहतील.
तुमच्या कनेक्शनची गती मंद असली, तरीही रोजचे क्षण कॅप्चर करा आणि संपादित करा व ते मानक किंवा उच्च दर्जाच्या डेफिनेशनमध्ये पाठवा.
चॅटमध्ये सुमारे एक मिनिटाच्या लांबीचे व्हिडिओ मेसेजेस त्वरित रेकॉर्ड आणि शेअर करून त्या क्षणाचा अनुभव कॅप्चर करा.
शोधण्यायोग्य आणि सानुकूल करण्यायोग्य स्टिकर्स, अवतार्स व GIFs वापरून सर्जनशीलतेला वाव द्या.
मेसेजेसवर प्रतिक्रिया देण्यासाठी कोणतेही इमोजी वापरा आणि तुमचे विचार सहजपणे व झटपट शेअर करा.
तुम्ही वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये स्टिकर ॲक्सेस करू शकता. स्टिकर पाहण्यासाठी आणि वापरण्यासाठी, चॅट उघडा, त्यानंतर स्टिकर आयकॉनवर टॅप करा. तुम्ही त्यावर टॅप करताच ते पाठवले जाईल. WhatsApp स्टिकर स्टोअरमधील सुचवलेली स्टिकर पॅक कोणत्याही डाउनलोड केलेल्या पॅकच्या खाली दाखवली जातात. तुम्ही यांपैकी कोणतीही स्टिकर पाठवण्यासाठी त्यांवर टॅप करू शकता किंवा संपूर्ण पॅक पाहण्यासाठी स्टिकर पॅक जोडा यावर टॅप करू शकता.
तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमधील मेसेजवर इमोजी वापरून प्रतिक्रिया देऊ शकता. तुम्ही मेसेजच्या खाली असलेल्या इमोजीवर टॅप करून मेसेजवरील सर्व प्रतिक्रिया पाहू शकता. एखाद्या मेसेजवर प्रतिक्रिया देण्यासाठी, तुम्ही मेसेजवर टॅप करून धरून ठेवा आणि त्यांनतर प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा टॅप करण्यासाठी इमोजीवर टॅप करा. तुमच्या कीबोर्डवरून इमोजी निवडण्यासाठी (वर्तुळ असलले अधिकचे चिन्ह) जोडा.
तुमच्या फोनवर पाठवलेले ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटो WhatsApp आपोआप सेव्ह करते. मीडिया दृश्यमानता हा पर्याय डीफॉल्टनुसार चालू केलेला असतो. WhatsApp ला तुमच्या डिव्हाइसच्या स्थानिक स्टोरेजवर स्वयंचलितपणे मीडिया सेव्ह करण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही अधिक पर्याय (तीन अनुलंब बिंदू) > सेटिंग्ज > चॅट यावर टॅप करू शकता.