आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा

शेवटचा बदल: ४ जानेवारी २०२१ (यापूर्वीच्या आवृत्त्या)

WhatsApp सेवाशर्ती

  • तुम्ही युरोपियन प्रदेशामध्ये राहत नसल्यास, WhatsApp LLC तुम्हाला या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणाच्या अंतर्गत WhatsApp प्रदान करते.*

WhatsApp करार सारांश आणि आम्हाला प्रदान करण्यासाठी युरोपियन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन कोडद्वारे आवश्यक असलेल्या माहितीसाठी येथे क्लिक करा.

आमच्या अॅप्स, सेवा, फीचर, सॉफ्टवेअर किंवा वेबसाईटद्वारे आमच्या सेवा (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) प्रदान करण्यासाठी आम्हाला आमच्या सेवाशर्तींसाठी ("शर्ती") तुमचा करार प्राप्त करण्याची गरज आहे.

WhatsApp Ireland Limited ("WhatsApp," "आमचे," "आम्ही," किंवा "आम्हाला") तुम्ही युरोपियन आर्थिक क्षेत्र असलेल्या (ज्यामध्ये युरोपियन युनियनचा समावेश आहे) देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये आणि इतर समाविष्ट कोणत्याही देश किंवा प्रदेशामध्ये (एकत्रितपणे "युरोपियन प्रदेश" म्हणून संदर्भित) राहत असल्यास तुम्हाला खाली वर्णन केलेल्या सेवा ("सेवा") प्रदान करते. तुम्ही युरोपियन प्रदेश शिवाय इतर कोणत्याही देश किंवा प्रदेशामध्ये राहत असल्यास WhatsApp LLC तुम्हाला या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणाच्या अंतर्गत तुम्हाला सेवा प्रदान करते.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

आमच्या सेवांबद्दल

  • गोपनीयता आणि सुरक्षा तत्त्वे. आम्ही WhatsApp सुरू केल्यापासून आम्ही कठोर गोपनीयता आणि सुरक्षा तत्त्वांचा विचार करून आमच्या सेवा निर्माण केल्या आहेत.
  • इतर लोकांसोबत तुम्हाला कनेक्ट करणे. इतर WhatsApp वापरकर्त्यांसाठी संदेश, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, प्रतिमा आणि व्हिडिओ पाठवून, तुमचे स्टेटस दाखवून आणि तुम्ही निवड करता तेव्हा तुमचे लोकेशन शेअर करण्याद्वारे आम्ही तुमच्यासाठी कम्युनिकेशनचे मार्ग प्रदान करतो आणि सुधारण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. WhatsApp ही भागीदार, सेवा प्रदाते आणि संलग्न कंपन्यांसोबत कार्य करते, जी आम्हाला तुमच्यासाठी त्यांच्या सेवांशी कनेक्ट होण्याकरता मार्ग प्रदान करण्यात मदत करते.
  • व्यवसायांसोबत संवाद साधणे. आम्ही तुमच्यासाठी आणि व्यवसाय व इतर संस्थांसाठी आमच्या सेवा जसे की ऑर्डर, व्यवहार आणि अपॉइंटमेंटची माहिती, डिलिव्हरी आणि शिपिंग सूचना, प्रॉडक्ट आणि सेवा अपडेट आणि मार्केटिंग यांद्वारे एकमेकांसोबत कम्युनिकेशन करण्यासाठीचे मार्ग प्रदान करतो आणि नेहमीच ते सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. आम्ही व्यवसाय आणि इतर संस्थांना त्यांच्या आमच्या सेवांच्या वापरासंबंधी आकडेवारी प्रदान करण्यासारखी विशिष्ट फीचर आणि सेवा ऑफर करतो.
  • सुरक्षितता, सुरक्षा आणि एकात्मता. आम्ही सुरक्षा, सुरक्षितता आणि आमच्या सेवांची सत्यता संरक्षित करण्यासाठी कार्य करतो. यामध्ये गैरवर्तन करणाऱ्या व्यक्ती आणि आमच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या कृतींना सामोरे जाणे समाविष्ट आहे. आम्ही आमच्या सेवांचा गैरवापर करण्यास प्रतिबंधित करण्याचे कार्य करतो ज्यात इतरांबद्दल हानिकारक आचरण असते. आम्हाला अशा प्रकारचे लोक किंवा क्रियाकलाप समजल्यास आम्ही अशा लोकांना किंवा क्रियाकलापांना काढून किंवा कायदा अंमलबजावणी विभागास संपर्क करून योग्य ती कारवाई करू. अशाप्रकारच्या लोकांना काढणे हे खालील "निरस्तीकरण" विभागानुसार असेल.
  • आमच्या सेवांसाठी अॅक्सेस सक्षम करणे. आमच्या वैश्विक सेवा संचालित करण्यासाठी आम्हाला आमच्या निवासाच्या देशासोबत जगभरातील डेटा केंद्रे आणि सिस्टीम्समध्ये सामग्री आणि माहिती साठविणे आणि वितरीत करणे गरजेचे आहे. आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी या पायाभूत सुविधांचा वापर गरजेचा आणि जरुरीचा आहे. या पायाभूत सुविधा आमच्या संलग्न कंपन्यांसह आमच्या सेवा प्रदात्यांद्वारे ऑपरेट केल्या जाऊ शकतात किंवा मालकीच्या असू शकतात.

कोणत्याही आपत्कालीन सेवांचा अॅक्सेस नाहीः आमच्या सेवा आणि तुमचा मोबाईल फोन आणि फिक्स्ड लाइन- टेलिफोन व एसएमएस सेवांमध्ये महत्त्वपूर्ण फरक आहेत. आमच्या सेवा आपत्कालीन सेवा किंवा पोलिस , अग्निशमन विभाग किंवा हॉस्पीटल्स किंवा आपत्कालीन सेवा प्रदात्यांना अॅक्सेस प्रदान करत नाही किंवा सार्वजनिक सुरक्षा उत्तर पॉइंट्सना कनेक्ट करत नाही. तुम्ही मोबाइल फोन, फिक्स्ड-लाइन टेलिफोन किंवा इतर सेवेद्वारे तुमच्या संबंधित आपत्कालीन सेवा प्रदात्यांशी संपर्क साधू शकता हे सुनिश्चित केले पाहिजे.

नोंदणी. अचूक माहिती वापरून, तुमचा सध्याचा मोबाईल नंबर देऊन आणि तुम्ही तो बदललेला असल्यास, तुमचा मोबाईल नंबर आमचे इन-ॲप नंबर बदला वैशिष्ट्य वापरून अपडेट करून, तुम्ही आमच्या सेवांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. आमच्या सेवांसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्ही कोडसह मजकूर संदेश आणि फोन कॉल्स (आमच्याकडून किंवा आमच्या तृतीय-पक्ष प्रदात्यांकडून) प्राप्त करण्यास सहमती दर्शवता.

पत्ता पुस्तिका. आमच्या सेवांचे वापरकर्ते आणि तुमच्या इतर संपर्कांसह, नियमितपणे तुमच्या ॲड्रेस बुकमधील फोन नंबर्ससह लागू असलेल्या कायद्यांद्वारे परवानगी दिली असल्यास, तुम्ही संपर्क अपलोड फीचर वापरू शकता आणि आम्हाला ते प्रदान करू शकता. येथे आमच्या संपर्क अपलोड फीचरबद्दल अधिक जाणून घ्या.

वय. तुम्ही युरोपियन प्रांतातील देश किंवा प्रदेशात राहत असल्यास पॅरेंटल मंजुरीशिवाय आमच्या सेवा वापरण्यासाठी तुमचे वय किमान १६ वर्षांचे असणे आवश्यक आहे किंवा तुमच्या देश किंवा प्रदेशामध्ये आमच्या सेवा वापरण्यासाठी किंवा नोंदणीसाठी तेवढेच वय असणे आवश्यक आहे. तुम्ही युरोपियन प्रांताशिवाय इतर कोणत्याही देशात राहत असल्यास तुम्ही आमच्या सेवा वापरण्यासाठी किमान १३ वर्षांचे असणे आवश्यक आहे किंवा आमच्या सेवा वापरण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी तुमच्या देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये त्यापेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे. लागू असलेल्या कायद्यांतर्गत आमच्या सेवा वापरण्याव्यतिरिक्त, तुमचे तुमच्या देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये आमच्या अटीशी सहमती दर्शवण्याच्या अधिकारासाठी पुरेसे वय नसल्यास तुमच्या पालकांनी किंवा मार्गदर्शकांनी तुमच्या वतीने आमच्या सेवा वापरण्यासाठी आमच्या अटींशी सहमत असणे आवश्यक आहे. कृपया तुमचे पालक किंवा मार्गदर्शकांना तुमच्यासोबत या अटी वाचण्यासाठी सांगा.

डिव्हाइसेस आणि सॉफ्टवेअर. आमच्या सेवा वापरण्यासाठी तुम्ही विशिष्ट डिव्हाइसेस, सॉफ्टवेअर आणि डेटा कनेक्शन प्रदान करणे आवश्यक आहे, ज्यांचा पुरवठा अन्यथा आम्ही करत नाही. तुम्ही व्यक्तिचलितपणे किंवा स्वयंचलितपणे आमच्या सेवांमध्ये अपडेट डाउनलोड करण्यासाठी आणि स्थापित करण्यासाठी सहमती देता. तुम्हाला आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी गरज म्हणून वेळोवेळी आमच्या सेवांद्वारे आमच्या तुम्हाला सूचना पाठवण्यासाठी देखील सहमती देता.

शुल्क आणि कर. तुम्ही आमच्या सेवा वापरण्याशी संबंधित सर्व कॅरियर डेटा प्लॅन, इंटरनेट शुल्क आणि इतर शुल्क व कर यासाठी तुम्ही जबाबदार आहात.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

गोपनीयता धोरण आणि वापरकर्ता डेटा

WhatsApp ला तुमच्या गोपनीयतेबद्दल काळजी वाटते. WhatsApp चे गोपनीयता धोरण आमच्या डेटा पद्धतींमध्ये आम्हाला प्राप्त होणाऱ्या आणि तुमच्याकडून संकलित केलेल्या माहितीचे प्रकार, ही माहिती आम्ही कशी वापरतो व शेअर करतो आणि तुमचे अधिकार तुमच्याबद्दल माहितीच्या प्रक्रियेसंदर्भात वर्णन करते.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

आमच्या सेवांचा स्वीकार्य वापर

आमच्या अटी व धोरणे. आमच्या अटी आणि धोरणांनुसार तुम्ही आमच्या सेवा वापरणे आवश्यक आहे. आमच्या अटी व धोरणांचे तुम्ही उल्लंघन केल्यास आम्ही तुमचे खाते अक्षम किंवा निलंबित करण्यासह त्यावर कारवाई करू शकतो आणि तसे केल्यास तुम्ही आमच्या परवानगीशिवाय दुसरे खाते तयार करणार नसल्याची सहमती देता. अशाप्रकारे खाते अक्षम करणे किंवा निलंबित करणे "समाप्ती" विभागानुसार असेल.

कायदेशीर आणि स्वीकार्य वापर. तुम्ही केवळ कायदेशीर, अधिकृत आणि स्वीकार्य हेतूंसाठी आमच्या सेवा अॅक्सेस करू शकता किंवा वापरू शकता. तुम्ही या प्रकारे आमच्या सेवा वापरू (किंवा इतरांना वापरण्यामध्ये सहकार्य) शकणार नाही: (a) गोपनीयता, प्रसिद्धी, बौद्धिक संपत्ती किंवा इतर मालकी हक्कांसह WhatsApp, आमच्या वापरकर्त्यांचे किंवा इतरांच्या हक्कांचे उल्लंघन, अयोग्य किंवा उल्लंघन करणे; (b) बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणे, धमकावणे, त्रास देणे, द्वेषपूर्ण, वांशिक किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह किंवा हिंसक गुन्ह्यांना चालना देण्यासह बेकायदेशीर किंवा अन्यथा अयोग्य असल्याचे आचरण करण्यास उद्युक्त करणे किंवा प्रोत्साहित करणे; (c) खोटे बोलणे, चुकीचे विधान करणे किंवा दिशाभूल करणारी विधाने प्रकाशित करणे; (d) एखाद्याची तोतयागिरी करणे; (e) बल्क संदेशन, स्वयं-संदेशन, स्वयं-डायलिंग आणि यासारख्या बेकायदेशीर किंवा दोषरहित संप्रेषणे पाठविणे; किंवा (f) अन्यथा आमच्याद्वारे अधिकृत केल्याशिवाय आमच्या सेवांचा कोणताही नॉन -वैयक्तिक वापर करणे.

* WhatsApp किंवा आमच्या वापरकर्त्यांची हानी*. तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, स्वयंचलित किंवा इतर मार्गांनी, परवानगी नसलेल्या किंवा अवैध पद्धतीने आमच्या सेवा ॲक्सेस करणे, वापर करणे, कॉपी करणे, स्वीकारणे, सुधारणे, आधारित व्युत्पन्न कार्ये तयार करणे, वितरित करणे, परवाना देणे, उपपरवाना देणे, ट्रान्सफर करणे, प्रदर्शित करणे, कार्यप्रदर्शन करणे, किंवा अन्यथा गैरवापर करणे, किंवा आम्ही, आमच्या सेवा, सिस्टिम्स, आमचे वापरकर्ते किंवा इतरांना त्रासदायक ठरणाऱ्या, अपाय करणाऱ्या किंवा नुकसान करणाऱ्या मार्गांनी हे करू नये (किंवा इतरांना सहाय्य करू नये), यामध्ये समावेश होतो की तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा स्वयंचलित मार्गांनी असे करणार नाही: (a) आमच्या सेवा उलटपुलट करणे, त्यात बदल करणे, सुधारणा करणे, त्यातून व्युत्पन्न कार्ये तयार करणे, डिकंपाइल करणे किंवा त्यातून कोड काढून घेणे; (b) आमच्या सेवांमार्फत किंवा त्यावर व्हायरस किंवा इतर हानीकारक कॉम्प्यूटर कोड पाठवणे, संग्रहित करणे, किंवा ट्रान्समिट करणे; (c) आमच्या सेवा किंवा सिस्टिम्सवर अनधिकृत ॲक्सेस मिळवणे किंवा तो मिळवण्याचा प्रयत्न करणे; (d) आमच्या सेवांची सुरक्षा, सुरक्षितता, गोपनीयता, अखंडता, उपलब्धता किंवा कार्यप्रदर्शन यामध्ये अडथळा आणणे किंवा खंडित करणे; (e) अनधिकृत किंवा स्वयंचलित मार्गांनी आमच्या सेवांसाठी खाती तयार करणे; (f) कोणत्याही परवानगी नसलेल्या किंवा अनधिकृत पद्धतीने आमच्या वापरकर्त्यांची किंवा त्यांच्याबद्दलची माहिती गोळा करणे; (g) कोणत्याही अनधिकृत पद्धतीने आमच्या सेवा किंवा आमच्याकडून किंवा आमच्या सेवांकडून प्राप्त केलेला डेटा विकणे, पुनर्विक्री करणे, भाडेतत्त्वावर देणे किंवा त्यासाठी शुल्क आकारणे; (h) नेटवर्कवरून आमच्या सेवा वितरित करणे किंवा उपलब्ध करून देणे, जेथे त्या एकाच वेळी अनेक डिव्हाइसेसवर वापरल्या जाऊ शकतात, आमच्या सेवांमार्फत आम्ही स्पष्टपणे प्रदान केलेल्या टूल्सद्वारे अधिकृत केल्यानुसार तो अपवाद वगळता; (i) लक्षणीयरित्या आमच्या सेवांच्या समान कार्य करणारे सॉफ्टवेअर किंवा APIs तयार करणे आणि ते अनधिकृत पद्धतीने तृतीय पक्षांना वापरण्यासाठी ऑफर करणे; किंवा (j) कोणत्याही रिपोर्टिंग चॅनेल्सचा दुरुपयोग करणे, जसे की फसवे किंवा विनाआधार रिपोर्ट किंवा अपील सबमिट करून.

तुमचे खाते सुरक्षित ठेवणे. तुमचे डिव्हाइस आणि तुमचे WhatsApp खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही कोणत्याही अनधिकृत वापराबाबत किंवा तुमच्या खात्याची सुरक्षा किंवा आमच्या सेवांचे उल्लंघन झाल्याबद्दल आम्हाला तात्काळ सूचित करणे आवश्यक आहे.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

तृतीय-पक्ष सेवा

आमच्या सेवा तुम्हाला तृतीय-पक्ष वेबसाइट, अॅप्स, सामग्री, इतर प्रॉडक्ट व सेवा आणि Facebook कंपनी प्रॉडक्ट्स अॅक्सेस करण्याची, वापरण्याची किंवा परस्पर संवाद साधण्यासाठी अनुमती देतात. उदाहरणार्थ, तुम्ही तृतीय-पक्ष डेटा बॅकअप सेवा वापरण्याचे निवडू शकता (जसे की iCloud किंवा Google Drive) किंवा तृतीय-पक्षाच्या वेबसाइटवरून शेअर करा बटणासह परस्पर संवाद साधू शकता जे तुम्हाला तुमच्या WhatsApp संपर्कावर माहिती पाठवण्यासाठी सक्षम करतात. कृपया लक्ष्यात घ्या या अटी आणि आमचे गोपनीयता धोरण केवळ आमच्या सेवांच्या वापरावर लागू होते. जेव्हा तुम्ही तृतीय-पक्ष प्रॉडक्ट किंवा सेवा किंवा इतर Facebook कंपनी प्रॉडक्ट्स वापरता तेव्हा त्यांच्या स्वतःच्या अटी आणि गोपनीयता धोरणे त्या प्रॉडक्ट किंवा सेवांच्या वापरावर नियंत्रण ठेवतील.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

परवाने

तुमचे अधिकार. तुम्ही तुमच्या WhatsApp खात्यासाठी किंवा आमच्या सेवांद्वारे जी माहिती सबमिट करता त्याच्या मालकी हक्काचा दावा WhatsApp करत नाही. तुमच्याकडे तुमच्या WhatsApp खात्यासाठी किंवा आमच्या सेवांद्वारे सबमिट केलेल्या माहितीचे आवश्यक ते सर्व हक्क असणे आणि आमच्या अटींमध्ये हक्क मंजूर करण्याचा हक्क आणि परवाने गरजेचे आहे.

WhatsApp हक्क. आमच्या सेवेशी संबंधित असलले सर्व कॉपीराइट्स, ट्रेडमार्क्स, डोमेन, लोगो, ट्रेड ड्रेस, ट्रेड गुपिते, पेटंट आणि इतर बौद्धिक मालमत्ता हक्कांची मालकी आमच्याकडे आहे. तुमच्याकडे आमची एक्सप्रेस परवानगी असल्याशिवाय आणि आमच्या ब्रँड मार्गदर्शकतत्त्वांशिवाय तुम्ही आमचे कॉपीराइट्स, ट्रेडमार्क (किंवा इतर कोणतेही समान मार्क). डोमेन्स, लोगो, ट्रेड ड्रेस, ट्रेड गुपिते, पेटंट किंवा इतर बैद्धिक मालमत्ता हक्क वापरू शकत नाही. तुम्ही कोणत्याही अधिकृत प्रकाशित ब्रँड मार्गदर्शकतत्त्वे समाविष्टित आमच्याशी संलग्न असलेल्या कंपन्यांचे ट्रेडमार्क केवळ त्यांच्या परवानगीने वापरू शकता.

तुमचा WhatsApp परवाना. आमच्या सेवा ऑपरेट करण्यासाठी आणि प्रदान करण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवरील किंवा त्याद्वारे अपलोड, सबमिट, स्टोअर, पाठवली किंवा प्राप्त केलेली माहिती तुम्ही WhatsApp ला जगभर, नॉन-एक्सक्लुझिव्ह, रॉयल्टी-फ्री, उपपरवानायोग्य आणि वापरासाठी हस्तांतणीय परवाना, पुनरूत्पादन, वितरीत, डेरिवेटिव्ह कार्य तयार करणे, प्रदर्शित करणे आणि सादर करण्याची सहमती देता. या परवान्यामध्ये तुम्ही मंजूर केलेले हक्क ऑपरेट करण्याच्या आणि आमची माहिती प्रदान करण्याच्या मर्यादित हेतूंसाठी असतात (जसे की आम्हाला तुमचे प्रोफाइल फोटो आणि स्टेटस संदेश प्रदर्शित करण्याची, तुमचे संदेश ट्रान्समिट करण्याची आणि आमच्या सर्वव्हरवर तुमचे डिलिव्ह न केलेले संदेश आम्ही ते वितरीत करेपर्यंत ३० दिवसांपर्यंत स्टोअर करण्याची अनुमती देणे).

तुमच्यासाठी WhatsApp परवाना. आम्ही आमच्या अटींच्या अधीन आमच्या सेवा वापरण्यासाठी मर्यादित, परत घेता येण्यासारखा, नॉन-एक्सक्लुझिव्ह, गैर-उपयोजित, आणि न-हस्तांतरणीय परवाना देतो. आमच्या अटींमधील अनुमतीनुसार हा परवाना केवळ आमच्या सेवा वापरण्याची क्षमता तुम्हाला देणे या उद्देशाने आहे. तुम्हाला स्पष्टपणे देण्यात आलेले परवाने आणि अधिकार वगळता तुम्हाला कोणतेही निहित किंवा अन्यथा परवाना किंवा अधिकार मंजूर केलेले नाही.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

तृतीय-पक्ष कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि इतर बौद्धिक मालमत्ता उल्लंघनांची तक्रार नोंदवणे

तृतीय-पक्ष कॉपीराइट, ट्रेडमार्क किंवा इतर बौद्धिक संपदा उल्लंघनाच्या दाव्यांच्या तक्रारींसाठी कृपया आमचे बौद्धिक संपदा धोरण पहा. तुम्ही स्पष्टपणे, गांभीर्याने किंवा सातत्याने इतरांच्या बौद्धिक मालमत्ता हक्काचे उल्लंंघन केल्यास किंवा कायदेशीर कारणांसाठी आम्हाला तसे करावे लागल्यास आम्ही तुमच्या खात्यावर कारवाई करू शकतो. अशाप्रकारे खाते अक्षम करणे किंवा निलंबित करणे "समाप्ती" विभागानुसार असेल.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

अस्वीकरण आणि रिलीझ

तुम्ही आमच्या सेवा तुमच्या जोखमीवर वापरता आणि पुढील अस्वीकरणाच्या अधीन आहेत. आम्ही आमच्या सेवा कोणत्याही एक्सप्रेस किंवा गर्भित हमीशिवाय "जसा आहे" तशा आधारावर प्रदान करीत आहोत, परंतु व्यापार क्षमतेची हमी, विशिष्ट उद्देशासाठी फिटनेस, शीर्षक, नॉन-उल्लंघन आणि कॉम्प्यूटर व्हायरस किंवा इतर हानीकारक कोडपासून स्वातंत्र्यासाठी मर्यादित नाही. आमच्याद्वारे देण्यात आलेली कोणतीही माहिती अचूक, पूर्ण किंवा उपयुक्त आहे, की आमच्या सेवा त्रुटी मुक्त, सुरक्षित किंवा रक्षित कार्यन्वित होतात, किंवा आमच्या सेवा विना व्यत्यय, विलंब किंवा दोषविरहित कार्य करतील याची आम्ही वॉरंटी देत नाही. आम्ही नियंत्रित करत नाही किंवा आमचे वापरकर्ते कसे आणि कधी आमच्या सेवा वापरतात याचे, किंवा आमच्या सेवा पुरवत असलेली फीचर, सेवा आणि इंटरफेसेस यांचे नियंत्रण करण्यासाठी जबाबदार नाही. आमचे वापरकर्ते किंवा इतर तृतीय पक्षांच्या कृती किंवा माहिती (सामग्रीसहित) नियंत्रित करण्यासाठी आम्ही जबाबदार नाही आणि ते बंधनकारक नाही. तुम्ही आम्हाला, आमच्या सहाय्यक, संलग्न कंपन्या, आणि आमचे आणि त्यांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, भागीदार आणि एजंट (एकत्रितपणे "WHATSAPP पक्ष") यांना कोणत्याही तृतीय पक्षाच्या विरुद्ध असलेल्या ज्ञात किंवा अज्ञात, त्याच्याशी संबंधित, त्यातून उत्पन्न होणाऱ्या किंवा इतर कोणत्याही प्रकारे अशा कोणत्याही दाव्याशी संबंधित, कोणत्याही दावे, तक्रार, कृतीचे कारण, मतभेद, विवाद किंवा हानी (एकत्रितपणे, "दावा"), यापासून मुक्त करता. WHATSAPP पक्षांशी संबंधित तुमचे अधिकार, जर तुमच्या देशातील किंवा तुम्ही निवासी असलेल्या प्रदेशातील कायदे, तुमच्या सेवेच्या वापराच्या परिणामी लागू होणारे, त्याची अनुमती देत नसल्यास, मागील अस्वीकरणाद्वारे सुधारित केले जात नाहीत.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

उत्तरदायित्वाची मर्यादा

WhatsApp केवळ पुढील मर्यादेपर्यंत जबाबदार आहे:

जीवन, शरीर किंवा आरोग्यास इजा झाल्यास; हेतू बाबतीत; घोर दुर्लक्ष झाल्यास; आणि प्रॉडक्ट उत्तरदायित्वाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाईच्या वैधानिक तरतुदीनुसार WhatsApp कोणत्याही मर्यादेशिवाय जबाबदार आहे.

तुम्हाला सेवा प्रदान करण्यासाठी WhatsApp व्यावसायिक व्यासंगाचा वापर करेल. आम्ही व्यावसायिक व्यासंगाने कार्य केले असेल तर या अटींचा भंग केल्याने किंवा आमच्या कृतीने झालेल्या या अटींचा स्वीकार करतेवेळी आणि आमच्या नकळत नियंत्रणापलिकडे आमच्याकडून किंवा तुमच्याकडून निष्कारण झालेल्या नुकसानाची जबाबदारी WhatsApp स्वीकारत नाही.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

विवाद निराकरण

तुम्ही ग्राहक असल्यास आणि युरोपियन प्रांत मधील देश किंवा प्रदेशात सातत्याने राहत असल्यास या अटी किंवा आमच्या सेवांद्वारे उद्भवलेल्या किंवा त्यासंबंधित तुमच्या आमच्या विरुद्ध असलेल्या कोणत्याही दाव्यासाठी तुमच्या देशाचे किंवा प्रांताचे कायदे लागू होतील आणि तुम्ही तुमच्या दाव्याचे कार्यक्षेत्र असलेल्या तुमच्या देशातील किंवा प्रदेशातील कोणत्याही सक्षम न्यायालयात तुमच्या दाव्याचे निराकरण करू शकता. इतर सर्व प्रकरणांमध्ये, तुम्ही सहमत आहात की हक्कावर कार्यक्षेत्र असलेल्या आयर्लंडमधील सक्षम न्यायालयात दावा सोडवणे आवश्यक आहे आणि आयर्लंडचे कायदे या अटींवर आणि कोणत्याही दाव्यावर कायद्याच्या तरतुदींशी विवाद न करता संचालन करतील.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

आमच्या सेवांची उपलब्धता आणि समाप्ती

आमच्या सेवांची उपलब्धता. आम्ही नेहमीच आमच्या सेवा सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. याचा अर्थ आम्ही आमच्या सेवा, वैशिष्ट्ये, कार्यक्षमता आणि काही डिव्हाइसेस आणि प्लॅटफॉर्म्सना सहाय्य करणे विस्तारीत करू, जोडू किंवा काढू शकतो असा होतो. आमच्या सेवांमध्ये देखभाल, दुरुस्ती, अपग्रेड करणे किंवा नेटवर्क किंवा उपकरणे अयशस्वी होण्यासह व्यत्यय येऊ शकतो. आम्ही ३० दिवसांच्या सूचनेच्या कालावधीनंतर काही फीचरसहित आणि काही विशिष्ट डिव्हाइसेस आणि प्लॅटफॉर्मवरील समर्थनासह आमच्या काही किंवा सर्व सेवा बंद करू शकतो, गैरवर्तनाला प्रतिबंध करणे, कायदेशीर आवश्यकतांना प्रतिसाद देणे किंवा सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या समस्येकडे लक्ष देणे यासारख्या तातडीच्या परिस्थितीत अशा कोणत्याही सूचनेची आवश्यकता नाही. आमच्या नियंत्रणापलिकडील घटना आमच्या सेवांवर परिणाम करू शकतात जसे की नैसर्गिक घटना आणि इतर सामर्थ्यवान घटना.

समाप्ती. आम्हाला आशा आहे की तुम्ही WhatsApp वापरकर्ता बनून रहाल, तथापि तुम्ही तुमचे खाते हटवून कोणत्याही कारणासाठी कधीही WhatsApp सोबतचे संबंध संपुष्टात आणू शकता. तसे कसे करायचे यावरील सूचनांसाठी आमच्या मदत केंद्रातील Android, iPhone, किंवा KaiOS ला भेट द्या.

कारणास्तव संपुष्टात आणण्याचा आमचा अधिकार प्रभावित करत नाही. जर एखाद्या पक्षाने कायद्यांचे, तृतीय-पक्षाच्या हक्कांचे उल्लंघन केले किंवा अन्यथा या अटींचा भंग केला तर सबळ कारण विद्यमान असल्याचे मानले जाईल आणि संपुष्टात येणार्‍या पक्षाने वैयक्तिक प्रकरणातील सर्व परिस्थिती विचारात घेतल्यानंतर आणि दोन्ही बाजूंच्या हितसंबंधांचा विचार करुन. मान्यताप्राप्त संपुष्टात येईपर्यंत किंवा नोटीसची मुदत संपेपर्यंत करारनामा चालू ठेवण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. उल्लंंघन इतर पक्षाच्या माहितीत आल्यानंतर सबळ कारणांसाठी संपुष्टात आणणे केवळ वाजवी कालावधीतच शक्य आहे.

या अटींच्या दायित्वाचे उल्लंघन झाले हे महत्त्वाचे कारण असल्यास, समाप्तीस केवळ मान्य केलेल्या उपाय कालावधीच्या अयशस्वी कालबाह्यतेनंतर किंवा अयशस्वी चेतावणीनंतर परवानगी आहे. तथापि, पक्षाने गंभीर उल्लंघन केले आणि शेवटी तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नकार दिल्यास किंवा दोन्ही पक्षांच्या हितांचा विचार केल्यास, विशेष परिस्थितीने त्वरित संपुष्टात आणण्याचे औचित्य सिद्ध केले तर हे लागू होणार नाही.

या "समाप्ती" विभागानुसार आम्ही संशयास्पद किंवा फसवणूकीसहित बेकायदेशीर आचरण करण्यासाठी किंवा सकारण आमच्या अटींचे तुम्ही उल्लंघन करत असल्याचे आम्हाला वाटत असल्यास किंवा आमच्यासाठी, आमच्या वापरकर्त्यांसाठी किंवा इतरांसाठी नुकसान, जोखीम किंवा संभाव्य कायदेशीर एक्सपोजर तयार केल्यास तुमचा आमच्या सेवांचा वापर किंवा त्यावरील अॅक्सेस कधीही समाप्त किंवा सुधारीत, निलंबित देखील करू शकतो. खाते रजिस्ट्रेशननंतर तुमचे खाते सक्रिय नाही झाले तर किंवा वाढीव कालावधीसाठी निष्क्रिय राहिल्यास आम्ही ते अक्षम करू किंंवा हटवू देखील शकतो. तुम्ही तुमचे खाते हटवल्यास किंवा आम्ही ते हटवल्यास किंवा अक्षम केल्यास या अटींचा तुमच्या आमच्यातील करार संपूष्टात येईल परंतु पुढील तरतुदी तुमच्या WhatsApp सोबतच्या संबंधाच्या कोणत्याही समाप्तीपासून बचाव करतीलः परवाने," "अस्वीकरण आणि रिलीझ," "दायित्वाची मर्यादा," "विवाद निराकरण," "आमच्या सेवांची उपलब्धता आणि समाप्ती," आणि "इतर." तुमच्या खात्याचे निरस्तीकरण किंवा निलंबन त्रुटीमुळे झाल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया आमच्याशी support@whatsapp.com यावर संपर्क साधा.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

इतर

  • तुम्ही आणि आमच्यामध्ये परस्परसंमतीने कार्यन्वित केलेला करार अन्यथा असे नमूद करत असेल तर, WhatsApp आणि आमच्या सेवा याबाबतीत आमच्या अटी तुमच्या आणि आमच्यामधील संपूर्ण करार बनवतात, आणि कोणत्याही आधीच्या करारांचे अधिग्रहण करतात.
  • भविष्यात आमच्या सेवा भिन्न अटींद्वारे शासित होतील (जिथे, लागू होतील त्यानुसार, तुम्ही स्वतंत्रपणे संमती देऊ शकता) हे नियुक्त करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.
  • आमच्या सेवा अशा कोणत्याही देशात किंवा प्रदेशात वितरित करण्याच्या किंवा वापरण्याच्या उद्देशाने नाहीत, जिथे असे वितरण किंवा वापर यामुळे स्थानिक कायद्याचे उल्लंघन होईल किंवा आम्हाला अन्य देशातील किंवा प्रदेशातील नियमनांच्या अधीन करेल. आमच्या सेवा कोणत्याही देशात किंवा प्रदेशात मर्यादित करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.
  • तुम्ही युनायटेड स्टेट्सच्या आणि युनायटेड स्टेट्स व्यतिरिक्त सर्व लागू होणाऱ्या एक्स्पोर्ट नियंत्रण आणि व्यापार मंजुरी कायद्यांचे पालन करू शकाल (“एक्स्पोर्ट कायदे”). तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आमच्या सेवा यांना एक्स्पोर्ट, पुनःएक्सपोर्ट, प्रदान किंवा अन्यथा ट्रान्सफर करणार नाही: (a) एक्स्पोर्ट कायद्यांद्वारे प्रतिबंधित कोणतीही व्यक्ती, एन्टिटी, प्रदेश किंवा देश; (b) युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड स्टेट्स व्यतिरिक्तच्या सरकारी मर्यादित पक्षांच्या याद्यांमधील कोणीही; किंवा (c) आवश्यक शासकीय अधिकृततेशिवाय न्यूकलिअर, रासायनिक किंवा जैविक शस्त्रास्त्रे, किंवा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान ॲप्लिकेशन्स यासह, एक्स्पोर्ट कायद्यांनी प्रतिबंधित कोणत्याही उद्देशाने. तुम्ही जर मर्यादित देशात किंवा प्रदेशात स्थित असाल, तुमचा सध्या कोणत्याही युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड स्टेट्स व्यतिरिक्तच्या सरकारी मर्यादित पक्षांच्या यादीमध्ये समावेश असेल तर, किंवा एक्स्पोर्ट कायद्यांनी प्रतिबंधित कोणत्याही उद्देशाने तुम्ही आमच्या सेवा डाउनलोड करणार किंंवा वापरणार नाही, आणि बनावट IP बनवणे किंवा इतर पद्धतींद्वारे तुम्ही तुमच्या लोकेशनबाबत दिशाभूल करणार नाही.
  • तुम्ही सादर केलेली आमच्या अटींमधील कोणतीही दुरुस्ती किंवा माफीसाठी आमची सुस्पष्ट संमती आवश्यक आहे.
  • तुमच्यासाठी व आमच्या समुदायासाठी प्रॉडक्ट अधिक चांगले करण्यासाठी आम्ही आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्याकरिता आणि नवीन फीचर विकसित करण्याकरिता सातत्याने कार्यरत असतो. परिणामी आमच्या सेवा व पद्धती अचूकपणे प्रतिबिंबित होण्यासाठी आम्हाला या अटी वेळोवेळी अपडेट कराव्या लागू शकतात. आम्ही केवऴ तरतुदी योग्य नसल्यास किंवा अपूर्ण राहिल्यास बदल करू शकू. कायद्याने किंवा आवश्यकता असल्यास आम्ही तुम्हाला आमच्या अटींमधील बदलांची आगाऊ सूचना किमान ३० दिवस आधी पाठवू (उदा. ईमेल किंवा सेवांद्वारे) जी तुम्हाला अटी प्रभावित होण्यापूर्वी सुधारीत अटींच्या पुनरावलोकनाची संधी देईल आणि आम्ही तुम्हाला असे कोणतेही बदल तुमच्यासाठी तुमच्या आवडी लक्ष्यात घेऊन वाजवी असतील याची खात्री देऊ. आम्ही आमच्या अटींच्या शीर्षस्थानी "अंतिम सुधारित" तारीख देखील अपडेट करू. आम्ही प्लॅन केलेल्या बदलांची सूचना प्रदान केल्यानंतर ३० दिवसांच्या आत या अटींमधील बदल प्रभावी होतील. कोणत्याही अपडेट केलेल्या अटी प्रभावी झाल्यावर, तुम्ही आमच्या सेवा वापरणे सुरू ठेवल्यास तुम्ही त्यांना बांधील असाल. आम्ही आशा करतो की तुम्ही आमच्या सेवा वापरणे चालू ठेवाल, परंतु, दुरुस्ती केल्यानुसार, तुम्ही आमच्या अटींशी सहमत नसाल तर, तुमचे खाते हटवून तुम्ही आमच्या सेवा वापरणे थांबवणे आवश्यक आहे.
  • आमच्या अटींनुसार आमचे सर्व अधिकार आणि जबाबदा्ऱ्या आमच्या कोणत्याही संबधित कंपनीला किंवा विलीनीकरण, अधिग्रहण, पुनर्रचना किंवा मालमत्तांच्या विक्रीसंदर्भात किंवा कायद्याच्या ऑपरेशनद्वारे किंवा त्याशिवाय स्वतंत्रपणे देण्यात आल्या आहेत. अशा नियुक्तीमध्ये लागू कायद्याच्या अनुपालनामध्ये तुमची माहिती ट्रान्सफर करू शकू आणि जेथे आवश्यक आहे तेथे संमती विचारू; या अटी अशा तृतीय-पक्षाबरोबरच्या तुमच्या संबंधांवर कायम रहतील. आम्हाला आशा आहे की तुम्ही WhatsApp वापरणे सुरू ठेवाल पण तुम्ही अशा असाइनमेंटशी सहमत नसल्यास तुम्हाला असाइनमेंटबद्दल सूचित केल्यानंतर तुमचे खाते हटवून तुमचा आमच्या सेवांचा वापर थांबवणे आवश्यक आहे.
  • आमच्या पूर्वलिखित संमतीशिवाय तुम्ही या अटींअतंर्गत आमचे कोणतेही अधिकार किंवा जबाबदाऱ्या इतर कोणालाही ट्रान्सफर करू शकणार नाही.
  • आमच्या अटींमधील काहीही आम्हाला कायद्याचे पालन करण्यास प्रतिबंधित करू शकणार नाही.
  • येथे चिंतन केलेल्या बाबींचा अपवाद वगळता, आमच्या अटी कोणतेही तृतीय पक्ष लाभार्थी अधिकार देत नाही.
  • आम्ही आमच्या कोणत्याही अटींची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी झालो तर ती सूट मानली जाणार नाही.
  • या अटींची कोणतीही तरतूद बेकारयदेशीर, निरर्थक किंवा कोणत्याही कारणासाठी अमलबजावणी झाली नसल्याचे आढळल्यास त्या तरतूदीची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक किमान मर्यादेपर्यंत दुरुस्ती समजली जाईल आणि त्याची अंमलबजावणी न केल्यास आमच्या अटींपासून विभक्त मानले जाईल आणि आमच्या अटींच्या उर्वरित तरतूदींच्या वैधता आणि अंमलबजावणीवर परिणाम करणार नाही आणि आमच्या अटींचा उर्वरित भाग संपूर्ण सशक्त आणि प्रभावी राहील.
  • आम्ही तुम्हाला स्पष्टपणे न दिलेले हक्क राखून ठेवतो. विशिष्ट अधिकार क्षेत्रात तुम्हाला ग्राहक म्हणून कायदेशीर अधिकार असू शकतात आणि आमच्या अटी असे ग्राहक कायदेशीर अधिकार जे कराराद्वारे सोडले जाऊ शकत नाहीत ते मर्यादित करण्याच्या उद्देश्याने नाहीत. तसेच, काही अधिकार क्षेत्रात, तुम्हाला डेटा विषय म्हणून कायदेशीर अधिकार असू शकतात आणि आमच्या अटी असे अधिकार जे कराराद्वारे सोडले जाऊ शकत नाहीत ते मर्यादित करण्याच्या उद्देश्याने नाहीत.
  • WhatsApp आणि आमच्या सेवा याबद्दलच्या तुमच्या अभिप्रायाचे किंवा इतर सूचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करतो, परंतु तुम्ही हे जाणून आहात की तुम्ही अभिप्राय किंवा सूचना देणे तुमच्यासाठी बंधनकारक नाही आणि आम्ही तुमचा अभिप्राय किंवा सूचना तुम्हाला त्यासाठी भरपाई न देता कोणत्याही मर्यादेशिवाय किंवा बंधनाशिवाय वापरू शकतो.

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

भिन्न भाषांमध्ये WhatsApp अटी अॅक्सेस करणे

इतर भाषांमध्ये अटी अॅक्सेस करण्यासाठी तुमच्या WhatsApp सत्रासाठी भाषा सेटिंग बदला. तुम्ही निवडलेल्या भाषेमध्ये आमच्या अटी उपलब्ध नसल्यास आम्ही मूळतः त्या इंग्लिश आवृत्तीमध्ये ठेवू.

कृपया आमच्या सेवांच्या तुमच्या वापराबद्दल जास्तीची माहिती देणारी खालील कागदपत्रे पुन्हा तपासा.

WhatsApp गोपनीयता धोरण

WhatsApp बौद्धिक संपदा धोरण

WhatsApp ब्रँड गाईडलाईन्स

पृष्ठाच्या अग्रस्थानी जा

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप