प्रमुख अपडेट
अंतिम सुधारणा: 04 जानेवारी, 2021
तुमच्या गोपनीयतेचा आदर करणे आमच्यामध्ये उपजत आहे. आम्ही WhatsApp ची सूरूवात केल्यापासून, आमच्या सर्व्हिस या कणखर गोपनीयता तत्त्वे लक्षात घेऊनच तयार केल्या आहेत. आमच्या अपडेट केलेल्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणामंध्ये तुम्हाला पुढील गोष्टी आढळतील:
- आम्ही तुमचा डेटा कसा हाताळतो यावरील अतिरिक्त माहिती. आमच्या अपडेट केलेल्या अटी आणि गोपनीयता धोरण आम्ही तुमच्या डेटावर कशी प्रक्रिया करतो आणि गोपनीयतेशी आमची कटिबद्धता यावरील अधिक माहिती प्रदान करतात. उदाहरहणार्थ आम्ही अगदी अलीकडील प्रॉडक्ट फीचरबद्दल आणि कार्यक्षमतेबद्दल, तसेच सुरक्षितता, सुरक्षा आणि अखंडतेसाठी आम्ही तुमच्या डेटावर कशी प्रक्रिया करतो याबाबत अधिक माहिती दिली आहे आणि वापरकर्ता सेटिंग्ज, मदत केंद्र लेख आणि तुम्ही तुमची माहिती कशी व्यवस्थापित करू शकता त्याबद्दलच्या थेट लिंक्स दिल्या आहेत.
- बिझनेसेससह अधिक चांगले संभाषण. पुष्कळ बिझनेसेस त्यांच्या ग्राहक आणि क्लायंटसह संभाषण करण्यासाठी WhatsApp वर अवलंबून आहेत. आम्ही अशा बिझनेसेससोबत कार्य करतो जे तुमच्यासोबत त्यांचे संभाषण WhatsApp वर चांगल्या प्रकारे स्टोअर करण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी Facebook किंवा तृतीय पक्षांचा वापर करतात.
- कनेक्ट करणे सोपे करणे. Facebook Companies चा एक भाग म्हणून, WhatsApp ने Facebook सह Facebook च्या अॅप्स आणि उत्पादनांच्या फॅमिलीवर अनुभव आणि एकीकरणे ऑफर करण्यासाठी भागीदारी केली आहे.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा