कुकीज
कुकीजबद्दल माहिती
कुकी ही एक छोटी टेक्स्ट फाइल असते जी तुम्ही तुमच्या संगणकावरून किंवा मोबाइल डिव्हाइसवरून वापरलेल्या वेबसाईट तुमच्या ब्राउझरला साठविण्यास सांगते.
आम्ही कुकीज कशाप्रकारे वापरतो
आम्ही आमच्या सेवांचा वापर समजावून घेण्यासाठी, त्या सुरक्षित करण्यासाठी, कार्यान्वित करण्यासाठी, आणि त्या प्रदान करण्यासाठी कुकीजचा वापर करतो. उदाहरणार्थ, आम्ही कुकीज येथे वापरतो :
- वेब आणि डेस्कटॉपसाठी WhatsApp प्रदान करणे आणि वेबवर चालणाऱ्या इतर सेवा यांवर तुमचा अनुभव सुधारण्यासाठी, आमच्या सेवा कशा वापरल्या जातात ते समजून घेण्यासाठी आणि आमच्या सेवा तुमच्या आवडीनुसार करण्यासाठी;
- नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये कोणते प्रश्न सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत आणि त्यानुसार आमच्या सेवांशी निगडित संबंधित माहिती तुम्हाला दाखविण्यासाठी;
- तुमची निवड लक्षात ठेवण्यासाठी जसे की तुमचे भाषा प्राधान्य, तसेच आमच्या सेवा तुमच्या आवडीनुसार कस्टमाइझ करण्यासाठी;
- नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची लोकप्रियतेनुसार वर्गवारी करण्यासाठी, आमच्या वेब सर्व्हिसेसवर चालणारे डेस्कटॉप ॲप्लिकेशन वापरणारे आणि त्या तुलनेत मोबाइल वापरकर्ते किती आहेत ते समजावून घेण्यासाठी किंवा आमच्या एखाद्या वेबपेजची लोकप्रियता आणि त्याचा प्रभाव समजावून घेण्यासाठी कुकीज वापरल्या जातात.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा
कुकीज वर कसे नियंत्रण ठेवाल
तुमचे कुकी सेटिंग बदलण्यासाठी तुमच्या ब्राउझर किंवा डिव्हाइसने पुरविलेल्या सूचनांचा अवलंब करा (या सूचना शक्यतो ब्राउझरच्या "सेटिंग्ज" किंवा "प्राधान्ये" मध्ये उपलब्ध असतात). कृपया हे लक्षात घ्या की जर तुम्ही तुमच्या ब्राउझरच्या किंवा डिव्हाइसच्या कुकीज डिसेबल केल्या असतील तर आमच्या काही सेवा सुरळीत न चालायची शक्यता आहे.
पृष्ठाच्या अग्रस्थानी जा