१६ जून, २०२५ पासून प्रभावी
या WhatsApp चॅनल्सचे सदस्यत्व घेणाऱ्या व्यक्तीसाठी सदस्यत्वाच्या सेवाशर्ती (“चॅनल्सचे सदस्यत्व घेणाऱ्या व्यक्तीसाठी अटी” किंवा “अटी”) तुमच्या (येथे तुम्ही, तुम्हाला आणि/किंवा सदस्यत्व घेणारी व्यक्ती म्हणून संदर्भ दिला आहे) चॅनल्सच्या सदस्यत्वामधील खरेदी आणि सहभागाचे नियमन करतात (खाली परिभाषित केल्याप्रमाणे). सामील होऊन किंवा अन्यथा चॅनल्सच्या सदस्यत्वात सहभागी होऊन, तुम्ही चॅनल्सचे सदस्यत्व घेणाऱ्या व्यक्तीसाठी असलेल्या सदस्यत्वाच्या या अटींना सहमती देता. कृपया या चॅनल्सचे सदस्यत्व घेणाऱ्या व्यक्तीसाठी असलेल्या सदस्यत्वाच्या अटी काळजीपूर्वक वाचा.
चॅनल्सचे मालक याचा अर्थ असा की अशी व्यक्ती किंवा घटक जो चॅनल्स सदस्यत्वाच्या कंटेन्टसह WhatsApp चॅनलचा मालक आहे.
चॅनल्सचे सदस्यत्व याचा अर्थ असा की WhatsApp वर चॅनल मालकाच्या चॅनल्स सदस्यत्वाच्या कंटेन्टमधील आणि/किंवा विशिष्ट डिजिटल फीचर्सच्या ॲक्सेसच्या बदल्यात उपलब्ध केलेले आवर्ती स्वरूपातील मासिक सदस्यत्व.
चॅनल्स सदस्यत्व कंटेन्ट याचा अर्थ असा की चॅनल मालकाने अशा सदस्यत्व घेणाऱ्या व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिलेला कंटेन्ट ज्यांनी त्या चॅनल मालकाच्या चॅनल्सचे सदस्यत्व घेतले आहे.
तुम्ही किंवा सदस्यत्व घेणारी व्यक्ती याचा अर्थ असा की जे WhatsApp कडून चॅनल्सचे सदस्यत्व खरेदी करतात.
नूतनीकरणाची तारीख याचा अर्थ असा की तुमच्या सदस्यत्वाच्या तारखेनंतरचा प्रत्येक महिन्यातील कॅलेंडर दिवस किंवा कॅलेंडर महिना आणि प्रत्येक वर्षातील कॅलेंडर दिवस (प्रत्येक केसमधील, लागू असल्याप्रमाणे), जो तुमच्या सदस्यत्वाच्या तारखेच्या कॅलेंडर दिवस किंवा कॅलेंडर महिना आणि दिवसाशी संबंधित असतो (प्रत्येक केसमधील, लागू असल्याप्रमाणे). प्रत्येक नूतनीकरणाच्या तारखेस, तुमच्या चॅनल्स सदस्यत्वाचे नूतनीकरण स्वयंचलितपणे होईल आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे चॅनल्सचे सदस्यत्व रद्द करत नाही किंवा खालील अटींनुसार, तुमचे चॅनल्सचे सदस्यत्व अन्यथा खंडीत होत नाही तोपर्यंत तुमच्याकडून दुसऱ्या सदस्यत्वाच्या सत्रासाठी शुल्क आकारले जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही मासिक सदस्यत्व निवडल्यास आणि तुमची सदस्यत्वाची तारीख (खाली वर्णन केल्याप्रमाणे) 15 फेब्रुवारी असेल तर, जोपर्यंत तुमचे चॅनल्सचे सदस्यत्व रद्द होत नाही किंवा अन्यथा खंडीत होत नाही तोपर्यंत तुमच्याकडून त्याच कॅलेंडर वर्षाच्या 15 मार्च रोजी चॅनल्स सदस्यत्वाच्या दुसऱ्या महिन्यासाठी आणि त्यानंतरच्या महिन्याच्या 15 व्या दिवशी शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही दिलेल्या महिन्यातील नसलेल्या कॅलेंडरच्या दिवशी चॅनलच्या सदस्यत्वासाठी देय दिल्यास, तुमची नूतनीकरणाची तारीख अशा महिन्याच्या शेवटच्या दिवशी असेल. उदाहरणार्थ, तुमची सदस्यत्वाची तारीख 31 मार्च असल्यास, तुमची पहिली नूतनीकरणाची तारीख 30 एप्रिल असेल आणि त्यानंतरच्या नूुतनीकरणाच्या तारखा त्यानंतरच्या महिन्यांतील 30 व्या दिवशी येतील.
सदस्यत्वाची तारीख याचा अर्थ असा की अशी तारीख जेव्हा तुम्ही या अटी स्वीकारता.
सदस्यत्वाचे सत्र याचा अर्थ असा की तुमच्या सदस्यत्वाच्या तारखेनंतरचा प्रत्येक एक-महिना. उदाहरणार्थ, तुम्ही मासिक सदस्यत्वाची एक योजना निवडल्यास आणि तुमची सदस्यत्वाची तारीख 15 मार्च असल्यास, तत्कालीन सदस्यत्वाचे सत्र त्याच कॅलेंडर वर्षाच्या 15 मार्चपासून ते 14 एप्रिलपर्यंत टिकेल आणि त्यानंतरचे सदस्यत्वाचे सत्र स्वंचलितपणे त्याच कॅलेंडर वर्षाच्या 15 एप्रिल रोजी सुरू होईल.
तृतीय-पक्ष प्लॅटफॉर्म प्रोव्हायडर(र्स) याचा अर्थ असा की WhatsApp-नसलेला एक प्लॅटफॉर्म, जसे की Apple App Store किंवा Google Play, ज्याद्वारे तुम्ही चॅनल्सचे सदस्यत्व खरेदी करता.