WhatsApp हा जगभरात कोणाशीही संपर्क साधण्याचा सर्वात जलद, सुलभ आणि विश्वासार्ह मार्ग आहे. जगभरातून १८० हून अधिक देशांमधील २० कोटीहून अधिक लोक स्वतःचा मित्र परिवार आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp चा वापर करतात. WhatsApp हे फक्त मोफतच नाही तर ते अनेक मोबाइल उपकरणांवर उपलब्ध असलेले आणि ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी समस्या आहेत अशा ठिकाणी देखील पोहोचू शकणारे ॲप आहे. त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथे संपर्काची आणि विश्वासार्हतेची हमी मिळते. तुमचे महत्त्वाचे क्षण शेअर करण्यासाठी, महत्त्वाची माहिती पाठवण्यासाठी किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी हे एक साधे आणि सुरक्षित असे माध्यम आहे. जगभरात कोठेही का असेनात, लोक एकमेकांशी जोडले जाणे आणि माहितीची देवाणघेवाण करणे हे WhatsApp मुळे अतिशय सोपे झाले आहे.
WhatsApp ला रोजगाराच्या समान संधी देणारा आणि सकारात्मक कृतीशील सेवायोजक असण्याचा अभिमान आहे. आम्ही वंश, धर्म, रंग, राष्ट्रीय मूळ, लिंग (गर्भारपण, प्रसूती, लैंगिक आरोग्याशी संबंधित निर्णय किंवा त्याच्याशी निगडित वैद्यकीय स्थिती यासकट), लैंगिक पसंती, लिंग ओळख, लिंग अभिव्यक्ती, वय, संरक्षित व्हेटरनचा दर्जा असणे, दिव्यांग व्यक्ती हा दर्जा असणे, आनुवंशिकीय माहिती, राजकीय मते किंवा कृती अथवा इतर संबंधित आणि कायद्याने संरक्षित वैशिष्ट्ये या गोष्टींवर आधारित भेदभाव करत नाही. तुम्ही आमची इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी सूचना येथे पाहू शकता. लागू पडणाऱ्या संघीय, राज्य व स्थानिक कायद्यांशी सुसंगत राहून आम्ही गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या पात्र उमेदवारांचादेखील विचार करतो. फेसबुक, फेसबुकचे कर्मचारी आणि इतर लोक यांची आवश्यक किंवा मान्य असलेल्या कायद्यानुसार सुरक्षा आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तुमच्या माहितीचा उपयोग केला जाऊ शकतो. आपण फेसबुकच्या पे ट्रान्स्परन्सी पॉलिसी आणि इक्वल अपॉर्च्युनिटी इज द लॉ सूचना त्यांच्या संबंधित लिंक्सवर क्लिक करून पाहू शकता. तसेच, WhatsApp कायद्यानुसार आवश्यक असलेल्या काही ठिकाणी ई-व्हेरिफाय कार्यक्रमात सहभागी होते.
WhatsApp आपल्या भरती प्रक्रियेत दिव्यांग उमेदवारांना उचित सूट देण्यास प्रतिबद्ध आहे. जर तुम्हाला विकलांगतेमुळे काही मदतीची किंवा सूट मिळण्याची आवश्यकता असेल, तर कृपया accommodations-ext@fb.com वर संपर्क करा.