WhatsApp कॉलिंग वापरून एकत्रितपणे आणखी बऱ्याच गोष्टी करा
स्क्रीन शेअरिंग, कॉल शेड्युलिंग आणि कॉलच्या लिंक यांद्वारे
रिअल टाइममध्ये कनेक्ट करणे आणि सहयोग करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे.
सर्व iOS आणि Android डिव्हाइसवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विनामूल्य*, विश्वसनीय व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारे तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांच्या जवळ रहा.
* डेटा शुल्के लागू होऊ शकतात. तपशिलांसाठी तुमच्या पुरवठादाराशी संपर्क साधा.
स्क्रीन शेअरिंग, कॉल शेड्युलिंग आणि कॉलच्या लिंक यांद्वारे
रिअल टाइममध्ये कनेक्ट करणे आणि सहयोग करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे.
व्हॉईस कॉलद्वारे तुमच्या मित्रांकडील आणि कुटुंबाकडील वृत्तांत घ्या किंवा वन-ऑन-वन आणि ग्रुप व्हिडिओ कॉल्स करून समोरासमोर बोला—ते नेहमी विनामूल्य* आणि अमर्यादित असतात.
*तुम्ही वायफाय किंवा डेटा पॅकेज वापरून कॉल करता तेव्हा
व्हिडिओ कॉलदरम्यान शेअर केलेल्या स्क्रीनवर एकत्रितपणे प्लॅन करा आणि सर्जनशीलतेला वाव द्या.
प्रत्येकाच्या शेड्युलनुसार मीटिंगची योग्य वेळ सेट करण्यासाठी इव्हेंट तयार करा—जेणेकरून सर्वांना सामील होता येईल.
कॉलची लिंक पाठवून कोणालाही WhatsApp वर तुमच्या कॉलमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण पाठवा.
सर्व आकारांच्या ग्रुपसाठी ऑडिओ हँगआऊट. अतिशय अटीतटीचा फुटबॉल गेम असो, गृहपाठातील एखादी समस्या असो किंवा अत्यंत महत्त्वाची बातमी शेअर करणे असो, काही वेळा तुम्हाला त्याक्षणी तुमच्या ग्रुप चॅटमध्ये उपलब्ध असणाऱ्यांशी बोलणे आवश्यक वाटते.
व्हॉइस कॉलिंगमुळे तुम्ही कॉल करत असलेली व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये असली, तरीही WhatsApp वापरून तुम्ही त्यांना विनामूल्य कॉल करू शकता. व्हॉइस कॉलिंग तुमच्या फोनच्या मोबाइल प्लॅनच्या मिनिटांऐवजी फोनमधील इंटरनेट कनेक्शन वापरते. डेटा शुल्के लागू होऊ शकतात. कॉल सुरू करण्यासाठी, तुम्ही कॉल करू इच्छिता ते ग्रुप चॅट उघडा आणि तुमचा कॉल सुरू करण्यासाठी फोन आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही कॉल टॅबवरून तुमच्या सध्याच्या ग्रुप चॅटच्या बाहेरीलदेखील संपर्क निवडू शकता.
व्हिडिओ कॉलिंगचा वापर करून तुम्ही तुमच्या संपर्कांना WhatsApp मधून व्हिडिओ कॉल करू शकता. कॉल सुरू करण्यासाठी, तुम्ही कॉल करू इच्छिता ते ग्रुप चॅट उघडा आणि तुमचा कॉल सुरू करण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही कॉल टॅबवरून तुमच्या सध्याच्या ग्रुप चॅटबाहेरील संपर्कदेखील निवडू शकता.
स्क्रीन शेअरिंग लोकांना त्यांच्या स्क्रीनवर असलेल्या गोष्टी रीअल टाइममध्ये शेअर करण्याची अनुमती देते. तुमची स्क्रीन शेअर करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कॉलमध्ये असणे आवश्यक आहे. व्हिडिओ नियंत्रणांमधील अधिक पर्याय (तीन अनुलंब बिंदू) यावर टॅप करा आणि त्यानंतर स्क्रीन शेअर करा यावर टॅप करा. तुमच्या फोनवर तुम्ही WhatsApp सोबत रेकॉर्ड करणे सुरू करत आहात असे दाखवणारा प्रॉम्प्ट दिसेल.
संमेलने आयोजित करण्यात व कनेक्ट केलेले राहण्यात मदत व्हावी म्हणून तुम्ही वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये इव्हेंट तयार करू शकता. इव्हेंटमध्ये उपयुक्त माहितीचा समावेश असतो, जी ग्रुपमधील सदस्यांना सहजरीत्या मिळवता येते. इव्हेंट तयार करण्यासाठी, तुमचे वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा आणि इव्हेंट > जोडा (अधिक चिन्ह) यावर क्लिक करा.
लिंक केलेली डिव्हाइस तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवरून WhatsApp ॲक्सेस करण्याचा विश्वासार्ह, सुरक्षित मार्ग प्रदान करतात. तुम्ही तुमच्या प्राथमिक फोनशी एकावेळी चार डिव्हाइसेस लिंक करून कनेक्टेड राहू शकता. तुमच्या WhatsApp खात्याची नोंदणी करण्यासाठी आणि नवीन डिव्हाइस लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्राथमिक फोनची अद्यापही आवश्यकता असेल.