मजकूर
सोपे, विश्वासार्ह मेसेजिंग
आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना मेसेज पाठवा तेही अगदी मोफत*.संदेश पाठवण्यासाठी WhatsApp इंटरनेटचा वापर करते ज्यायोगे तुम्ही एसएमएस साठीचे शुल्क टाळू शकता.
ग्रुप चॅट
संपर्कात राहण्यासाठी ग्रुप
ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्वाच्या आहेत जसे की तुमचे कुटुंबीय किंवा सहकारी यांच्या बरोबर संपर्कात रहा. ग्रुप चॅट द्वारे तुम्ही एकाचवेळी कमाल २५६ लोकांना संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता. तुम्ही तुमच्या ग्रुपला नाव देऊ शकता, नोटिफिकेशन्स म्यूट किंवा नियंत्रित करू शकता, तसेच इतरही अनेक गोष्टी करू शकता.
वेब आणि डेस्कटॉप वर WhatsApp
संभाषण असेच चालू ठेवा
वेब आणि डेस्कटॉपवर असलेल्या WhatsApp च्या साहाय्याने तुम्ही सहजगत्या तुमच्या चॅट तुमच्या संगणकावर सिन्क म्हणजेच सुसंबद्ध करू शकता ज्यायोगे तुम्हाला जे कोणते डिव्हाइस सोयीस्कर वाटते त्यावर तुम्ही चॅट करू शकता. सुरू करण्यासाठी डेस्कटॉप ॲप डाउनलोड करा किंवा web.whatsapp.com ला भेट द्या.
WhatsApp व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स
बोला मुक्तपणे
व्हॉइस कॉल्स द्वारे तुम्ही मित्रमैत्रिणी व कुटुंबियांशी बोलू शकता, तेही चक्क मोफत*, अगदी ते परदेशी असले तरीही. आणि जेव्हा तुमचा आवाज आणि मजकूर पुरेसा नसतो तेव्हा मोफत* व्हिडिओ कॉल्स द्वारे तुम्ही समोरासमोर संभाषण देखील साधू शकता. WhatsApp चे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स हे तुमच्या मोबाइल डेटा प्लॅनचे व्हॉइस मिनिट्स न वापरता फोनचे इंटरनेट कनेक्शन वापरते, त्यामुळे तुम्हाला महागड्या कॉलिंग चार्जेसची चिंता करण्याची गरज नाही.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन
मूलभूत सुरक्षा
तुमचे अत्यंत खाजगी असे काही क्षण WhatsApp द्वारे शेअर केले जातात, आणि म्हणूनच आमची नवीन ॲप आवृत्ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच संपूर्णपणे कूटबद्ध केलेली आहे. जेव्हा तुमचे मेसेजेस संपूर्णपणे कूटबद्ध केलेले असतात तेव्हा तुमचे मेसेजेस आणि कॉल्स सुरक्षित केलेले असतात ज्यामुळे तुम्ही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही संवाद साधू इच्छित आहात तेच फक्त त्यांना वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही.
फोटो आणि व्हिडिओ
असे क्षण शेअर करा जे मोलाचे आहेत
WhatsApp वर आता तुम्ही तत्काळ फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता. बिल्ट इन कॅमेरा वापरून तुम्हाला जे क्षण मोलाचे वाटतात ते सुद्धा तुम्ही टिपू शकता. तुम्ही जरी मंद कनेक्शन वर असलात तरी WhatsApp च्या साहाय्याने तुम्ही अतिशय तत्परतेने फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता.
व्हॉइस मेसेज
तुमच्या मनात काय आहे ते बोला
कधीकधी तुमचा आवाज सर्वकाही सांगून जातो. फक्त एका टॅप ने तुम्ही व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करू शकता, चटकन हॅलो म्हणण्यासाठी किंवा एखाद्या छोट्याशा कहाणीसाठी अगदी परफेक्ट.
डॉक्युमेंट्स
डॉक्युमेंट शेअरिंग सोपे करण्यात आले आहे
ईमेल किंवा फाईल शेअरिंग ॲपची उस्तवार न करता आता तुम्ही PDFs, डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, स्लाईडशोज आणि इतर पाठवू शकता. तुम्ही कमाल १०० MB इतक्या साईझचे डॉक्युमेंट्स पाठवू शकता त्यामुळे कोणापर्यंतही तुम्हाला जे हवे आहे ते पोहोचवणे अगदी सोपे होऊन जाईल.