तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि परिवाराला निःशुल्क मेसेजेस पाठवा*. तुम्हाला SMS शुल्क लागू होऊ नये म्हणून, मेसेजेस पाठविण्यासाठी WhatsApp तुमच्या फोनचे इंटरनेट कनेक्शन वापरते
.
तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींचे ग्रुप, उदाहरणार्थ, तुमचे कुटुंबीय किंवा सहकारी, यांच्याशी संपर्कात रहा. ग्रुप चॅट्स वापरून तुम्ही एका वेळी २५६ व्यक्तींबरोबर मेसेजेस, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकता. तुम्ही तुमच्या ग्रुपला नाव देऊ शकता, नोटिफिकेशन्स म्यूट किंवा सानुकूल करू शकता, तसेच बरेच काही करू शकता.
वेब आणि डेस्कटॉप वर WhatsApp असल्याने तुम्ही तुमचे सर्व चॅट तुमच्या कॉम्प्युटरशी विनासायास सिंक करू शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या सर्वात सोयीच्या डिव्हाइसवरून चॅट करू शकता. डेस्कटॉप ॲप डाउनलोड करा किंवा web.whatsapp.com ला भेट द्या आणि सुरुवात करा
व्हॉइस कॉलच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रमैत्रीणींशी किंवा कुटुंबियांशी, जरी ते दुसऱ्या देशात असले तरीही, निःशुल्क* बोलू शकता. तसेच निःशुल्क* व्हिडिओ कॉलच्या मदतीने, जेव्हा आवाज किंवा मजकूर पुरेसा वाटत नाही तेव्हा, तुम्ही एकमेकांना बघत संभाषणे करू शकता. WhatsApp व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स तुमच्या मोबाईल योजनेच्या व्हॉइस मिनिटांऐवजी तुमच्या फोनचे इंटरनेट कनेक्शन वापरतात, जेणेकरून तुम्हाला महागड्या कॉलिंग शुल्काची चिंता करण्याची आवश्यकता नाही.
तुमचे काही अत्यंत वैयक्तिक क्षण WhatsApp वर शेअर केले जातात आणि म्हणूनच आमच्या ॲपच्या नवीनतम आवृत्तीमध्ये आम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा देऊ केलेली आहे. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन केलेले असताना तुमचे मेसेजेस आणि कॉल्स सुरक्षित असतात, ज्यामुळे केवळ तुम्ही आणि ज्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधता ती व्यक्ती याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील ते वाचू किंवा ऐकू शकत नाही.
तत्क्षणी WhatsApp वर फोटो आणि व्हिडिओ पाठवा. तुमच्यासाठी मौल्यवान असलेले क्षण तुम्ही बिल्ट-इन कॅमेरा वापरून कॅप्चर देखील करू शकता. तुमचे कनेक्शन मंद असले तरीदेखील WhatsApp सह फोटो आणि व्हिडिओ त्वरित पाठवा.
कधीकधी, तुमचा आवाज सर्व काही सांगून जातो. फक्त एका टॅपने तुम्ही व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करू शकता, केवळ हॅलो म्हणण्यासाठी किंवा एखादा मोठा किस्सा सांगण्यासाठी, दोन्हीसाठी उत्तम.
ईमेल किंवा शेअरिंग ॲप वापरण्याच्या कटकटीशिवाय PDF, डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, स्लाइडशोज आणि इतरही बरेच काही पाठवा. तुम्ही 100 MB पर्यंत डॉक्युमेंट्स पाठवू शकता, म्हणजेच तुम्हाला ज्यांना हवे त्यांना काहीही पाठवणे सोपे होते.