आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्ट केलेले रहाकम्युनिटी बनवास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • प्रायव्हसी
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
डाउनलोड करा
सेवाशर्ती2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्ट केलेले रहा

      तुमच्या जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचा.

    • कम्युनिटी बनवा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp बिझनेस

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
WhatsApp वेबडाउनलोड करा

तुमचे खाते WhatsApp Messenger वरून WhatsApp Business ॲपवर कसे हलवावे

WhatsApp Business ॲप डाउनलोड करून सेटअप करणे

1. तुमच्या WhatsApp Messenger खात्याचा बॅकअप घ्या: जर तुम्ही WhatsApp Messenger खाते WhatsApp Business मध्ये ट्रान्सफर करत असाल तर बॅकअप घेण्याची आम्ही शिफारस करतो. बॅकअप न घेतल्यास तुम्ही पूर्वीचे चॅट गमवू शकता. WhatsApp Messenger उघडा. Android वर, वर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज वर टॅप करा. iPhone वर, तुमच्या चॅट स्क्रीनवरील सेटिंग्ज वर टॅप करा. सेटिंग्ज मधून, चॅट नंतर चॅट बॅकअप नंतर बॅकअप किंवा आता बॅकअप घ्या वर टॅप करा. बॅकअप पूर्ण झाल्यावर पुढील पायरीवर जा.

2. WhatsApp Business ॲप डाउनलोड करून लाँच करा: WhatsApp Business ॲप Google Play स्टोअर आणि Apple App स्टोअर वरून मोफत डाउनलोड करता येते. तुमच्या होम स्क्रीनवरील WhatsApp Business आयकॉनवर टॅप करा.

3. सेवाशर्ती पुन्हा तपासा: WhatsApp Business च्या सेवाशर्ती वाचा, आणि सेवाशर्ती स्वीकारण्यासाठी, 'सहमती आहे आणि पुढे चालू ठेवा' वर टॅप करा.

4. नोंदणी करा: WhatsApp Business तुम्ही WhatsApp Messenger साठी वापरत असलेला नंबर आपोआप ओळखते. पुढे चालू ठेवण्यासाठी, तुमचा बिझनेस नंबर सोबतच्या पर्यायावर टॅप करा.

5. तुमचे खाते ट्रान्सफर करा: खाते ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत WhatsApp Business ॲप उघडून, तुमचा फोन सुरू ठेवा. खाते हलवण्याची प्रक्रिया आपोआप होत असताना, तुम्हाला तुमच्या बॅकअपमधून रिस्टोअर करण्याची सूचना मिळू शकेल. पुढे चालू ठेवा किंवा रिस्टोअर करा वर टॅप करा. त्यानंतर, सूचना दाखवली गेल्यास पुढे वर टॅप करा.

6. संपर्क आणि फोटोज ॲक्सेस करण्याची अनुमती द्या: तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मधून WhatsApp Business ॲप मध्ये संपर्क जोडले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या फोनवरील फोटोज, व्हिडिओज आणि फाइल्स देखील ॲक्सेस करण्याची अनुमती देऊ शकता.

7. खाते तयार करा: तुमच्या बिझनेसचे नाव भरा, बिझनेस कॅटेगरी निवडा आणि प्रोफाइल फोटो निवडा.

8. तुमचे बिझनेस प्रोफाइल तयार करा: एक्सप्लोर करा > बिझनेस प्रोफाइल वर टॅप करा. इथे तुम्ही तुमच्या बिझनेसचा पत्ता, बिझनेसबद्दल माहिती, कामाचे तास आणि यासारखी बिझनेस संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती लिहू शकता.

9. चॅट सुरू करा. तुमचे बिझनेस प्रोफाइल आता सेट झाले आहे. किंवा वर टॅप करा आणि मेसेज करण्यासाठी संपर्क शोधा किंवा निवडा. मजकुरासाठी असलेल्या जागेत तुमचा मेसेज एंटर करा. नंतर, किंवा वर टॅप करा.

WhatsApp Business टूल्स एक्सप्लोर करा

WhatsApp Business ॲपमध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस उत्तमरीत्या चालवण्यात मदत करणारी अनेक टूल्स आहेत. ही टूल्स एक्सप्लोर करण्यासाठी तुमच्या चॅट स्क्रीनवर जा. Android वर अधिक पर्यायकिंवा iPhone वर सेटिंग्ज वर टॅप करा. त्यानंतर, बिझनेस टूल्स वर टॅप करा.

  • कॅटलॉग: तुमच्या बिझनेस खात्यात तुमचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस दाखवा आणि त्याबद्दलची माहिती शेअर करा. Android किंवा iPhone वर कॅटलॉग कसे तयार करायचे ते जाणून घ्या.
  • शॉर्ट लिंक: नव्या ग्राहकांना तुमच्यासोबत जोडले जाणे सोपे करा. नव्या ग्राहकांना तुमच्या बिझनेसला मेसेज पाठवता यावा यासाठी आपोआप जनरेट झालेली शॉर्ट लिंक त्यांच्यासोबत शेअर करा. Android किंवा iPhone वर शॉर्ट लिंक कशी वापरायची ते जाणून घ्या.
  • मेसेजिंग टूल्स: महत्त्वाची संभाषणे आगाऊ तयार करण्यासाठी WhatsApp मेसेजिंग टेम्प्लेेट्स वापरा. नव्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी ऑटोमेटेड स्वागत संदेश तयार करा. तुम्हाला उत्तर द्यायला वेळ होत नसेल तर 'व्यस्तता संदेश' सेट करा किंवा वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 'तात्काळ प्रत्युत्तरे' सेट करा. मेसेजिंग टूल्सविषयी अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा:
    • Android किंवा iPhone वर स्वागत संदेश कसे वापरायचे
    • Android किंवा iPhone व्यस्तता संदेश कसे वापरायचे
    • Android किंवा iPhone वर तात्काळ प्रत्युत्तर कसे वापरायचे
  • लेबल: “नवीन ग्राहक” किंवा “पेंडिंग ऑर्डर्स” सारख्या उपयुक्त कॅटेगरीज मध्ये तुमची ग्राहकांसोबत झालेली संभाषणे क्रमवार लावा. Android किंवा iPhone वर लेबल कसे वापरायचे ते जाणून घ्या.
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्‍लॉगस्टोरीजबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरस
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

सेवाशर्ती