आमच्या सर्व्हिस ऑपरेट करणे, प्रदान करणे, त्यांच्यात सुधारणा करणे, त्या समजून घेणे, कस्टमाइझ करणे, त्यांना सपोर्ट देणे आणि मार्केट करणे यासाठी WhatsApp ला काही माहिती प्राप्त करणे किंवा संकलित करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्ही आमच्या बिझनेस सर्व्हिस केव्हा इंस्टॉल करता, ॲक्सेस करता किंवा वापरता या माहितीचा समावेश असतो.
तुम्ही आमच्या बिझनेस सर्व्हिस कशा वापरता यावर आम्ही कोणत्या प्रकारची माहिती प्राप्त आणि संकलित करतो हे अवलंबून असते. आमच्या बिझनेस सर्व्हिस डिलिव्हर करण्यासाठी आम्हाला विशिष्ट माहितीची आवश्यकता असते आणि त्याशिवाय आम्ही तुम्हाला आमच्या बिझनेस सर्व्हिस प्रदान करू शकणार नाही. आम्ही गोळा करत असलेल्या माहितीमध्ये तुम्ही प्रदान केलेली माहिती, आपोआप गोळा झालेली माहिती आणि तृतीय पक्ष माहिती यांचा समावेश असतो.
आमच्याकडे असलेली माहिती आम्ही (तुमच्या निवडी आणि लागू असलेल्या कायद्याच्या अधीन राहून) आमच्या बिझनेस सर्व्हिस ऑपरेट करणे, प्रदान करणे, त्यांच्यात सुधारणा करणे, त्या समजून घेणे, कस्टमाइझ करणे, त्यांना सपोर्ट देणे आणि मार्केट करणे यासाठी वापरतो.
तुम्ही आमच्या बिझनेस सर्व्हिस वापरता आणि त्यांच्याद्वारे संवाद साधता तेव्हा तुम्ही तुमची माहिती शेअर करता आणि आम्ही तुमची माहिती आमच्या बिझनेस सर्व्हिस ऑपरेट करणे, प्रदान करणे, त्यांच्यात सुधारणा करणे, त्या समजून घेणे, कस्टमाइझ करणे, त्यांना सपोर्ट देणे आणि मार्केट करणे यासाठी मदत व्हावी म्हणून शेअर करतो.
आम्ही कोणती माहिती संकलित करतो आणि आम्ही ती कशा पद्धतीने वापरतो व शेअर करतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया
WhatsApp Business ॲप गोपनीयता धोरण वाचा.