1)श्रीदत्त देवस्थान, मठ, आडी हे क्षेत्र पुणे बेंगलोर हायवे ( NH-4) वर आहे. हे स्थान कोल्हापूर पासून ३७किमी वर आहे. कागल- निपाणी च्या मध्यात हे स्थान आहे. कागल पासून १०किमी व निपाणी पासून १२किमी वर आहे. 2)आडी येथे असलेल्या संजीवनगिरी नांवाच्या डोंगराच्या मध्यात अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे श्री दत्त क्षेत्र आहे. 3)इथे पायथ्याला एक अत्यन्त प्रशस्त असे सांस्कृतिक भवन आहे. तसेच अन्यही एक मोठी वास्तू आहे ज्यात भाविकांच्या निवासाची सोय केली जाते. 4) डोंगरमध्यावर ७० फूट उंची असलेले श्रीदत्त मंदिर आहे. मंदिराच्या जवळ दोन मोठ्या इमारती आहेत व इतरही काही बांधकामे आहेत. 5)इथे दरवर्षी प.पू. परमात्मराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तजयन्तीचा महोत्सव सात आठ दिवस मोठ्या मात्रेत चालत असतो. तसेच दर पौर्णिमेला महाराजांचा प्रवचनाचा कार्यक्रम होत असतो. श्रीदत्त देवस्थान येथे होणारे कार्यक्रम व परमपूज्य परमात्मराज महाराजांची प्रवचने इ. संदर्भातील माहिती इथे देण्यात येईल. 8147871727