WhatsApp Business अॅप

WhatsApp Business हे एक Android अॅप असून ते विनाशुल्क डाउनलोड करता येते आणि ते लघु उद्योजकांचा विचार करूनच निर्माण करण्यात आले आहे. ते तुम्हाला संदेश पाठविणारी विविध साधने प्रदान करते जसे की स्वयंचलित संदेश पाठविणे, संदेशांची वर्गवारी करणे आणि संदेशांना तात्काळ प्रत्युत्तर देणे, अशा साधनांद्वारे व्यावसायिकांना त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधणे सहज शक्य होते.

झळकत राहा

व्यवसाय प्रोफाइल

तुमच्या व्यवसायाचे असे प्रोफाइल तयार करा ज्यामध्ये तुमच्या ग्राहकांना तुमचा पत्ता, व्यवसायाची माहिती, ई-मेल ऍड्रेस आणि वेबसाईट याची माहिती मिळेल.

अधिकाधिक संदेश पाठवा, काम हलके करा

तात्काळ प्रत्युत्तरे

तात्काळ प्रत्युत्तर सारखे वैशिष्ट्य वापरून तुम्हाला उत्तर म्हणून जे संदेश वारंवार वापरावे लागतात ते साठवून त्याचा पुनर्वापर करून अशा प्रश्नांना तात्काळ उत्तर देणे सहज शक्य होते.

तात्काळ प्रत्युत्तर द्या

संदेश साधने

जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकांना उत्तर देण्यासाठी उपलब्ध नसता तेव्हा व्यस्तता संदेश सेट करून तुम्ही त्यांना कधी उत्तर द्याल ते कळवू शकता. स्वागत संदेश सेट करून तुम्ही तुमच्या ग्राहकांना तुमच्या व्यवसायाची माहिती देऊ शकता.

अधिक सखोल माहिती जाणून घ्या

संदेशन आकडेवारी

तुमचे किती संदेश यशस्वीरीत्या पाठविले गेले, प्राप्त झाले आणि वाचले गेले याची महत्त्वाची माहिती मॅट्रिक्स च्या स्वरूपात पहा.