WhatsApp बद्दल

आमचे अॅप

कधीही आणि कोठूनही मित्र आणि कुटुंबियांच्या संपर्कात राहण्यासाठी तब्बल १८० देशांमधून १ अब्ज पेक्षाही जास्त लोक WhatsApp1 वापरतात. WhatsApp हे मोफत आहे आणि सोपे, सुरक्षित, विश्वासार्ह मेसेजिंग आणि कॉलिंग असून, संपूर्ण जगभरात फोनवर उपलब्ध आहे.

1 आणि हो, WhatsApp हा What's Up या वाक्प्रचाराचा एक श्लेष आहे.

2 डेटा शुल्क पडू शकते.

आमचे ध्येय

WhatsApp हे SMS साठी पर्याय म्हणून सुरु करण्यात आले. आता आमचे हे उत्पादन निरनिराळा मीडिया पाठविणे आणि मिळविणे यासाठी साहाय्य करते जसे की : मजकूर, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, तुमचे ठिकाण आणि व्हॉइस कॉल्स सुद्धा. आमचे संदेश आणि कॉल्स हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनने अर्थात संपूर्णपणे कूटबद्ध करून सुरक्षित केले आहेत याचा अर्थ कोणताही तृतीय पक्ष अगदी WhatsApp देखील त्यांना वाचू अथवा ऐकू शकत नाही. जगभरात कोठेही कोणत्याही अडथळ्याविना लोकांना परस्परांशी संवाद साधता यावा हीच आकांक्षा मनात ठेऊन आम्ही आमच्या प्रत्येक उत्पादनाची संरचना केलेली आहे.

आमची समिती

WhatsApp ची स्थापना 'यान कौम' आणि 'ब्रायन अॅक्टन' या दोघांनी केली ज्यांनी पूर्वी २० वर्षे Yahoo मध्ये एकत्रितपणे काम केले. WhatsApp २०१४ मध्ये Facebook मध्ये सामील झाले परंतु ते स्वतंत्र अॅप म्हणून कार्यरत राहील आणि संपूर्ण जगभरात वेगवान आणि विश्वासार्ह मेसेजिंग सेवा निर्माण करण्यावर जास्तीत जास्त भर देईल.