१८० हून अधिक देशांमधील शंभर कोटीपेक्षा अधिक लोक, त्यांच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत केव्हाही आणि कुठेही संपर्कात राहाता यावे यासाठी WhatsApp1 वापरतात. जगभरातील फोन्सवर उपलब्ध असलेले WhatsApp पूर्णपणे मोफत2 असून ते सोपे, सुरक्षित, विश्वासार्ह मेसेजिंग आणि कॉलिंग उपलब्ध करून देते.
१ आणि हो, WhatsApp हा What's Up या वाक्प्रचाराचा एक श्लेष आहे.
२ डेटा शुल्क पडू शकते.
WhatsApp हे अॅप एसएमएससाठी पर्याय म्हणून सुरू करण्यात आले. आता आमचे हे प्रॉडक्ट मजकूर, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, लोकेशन तसेच व्हॉइस कॉल्स अशा वेगवेगळ्या मीडिया फाइल्स पाठवण्यात आणि मिळवण्यात मदत करते. तुम्ही तुमचे खाजगी क्षणही WhatsApp वर शेअर करत असता हे ध्यानात घेऊनच आम्ही आमच्या अॅपला एन्ड- टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले आहे. जगभरात कोठेही, कोणत्याही अडथळ्याविना लोकांना परस्परांशी संवाद साधता यावा हीच आकांक्षा मनात ठेऊन आम्ही आमच्या प्रत्येक प्रॉडक्टचे निर्माण केलेले आहे.
WhatsApp ची स्थापना 'यान कौम' आणि 'ब्रायन ॲक्टन' या दोघांनी केली ज्यांनी पूर्वी २० वर्षे Yahoo मध्ये एकत्रितपणे काम केले. WhatsApp २०१४ मध्ये Facebook मध्ये सामील झाले परंतु ते स्वतंत्र ॲप म्हणून कार्यरत राहील आणि संपूर्ण जगभरात वेगवान आणि विश्वासार्ह मेसेजिंग सेवा निर्माण करण्यावर जास्तीत जास्त भर देईल.