सोपे. सुरक्षित.
विश्वासार्ह मेसेजिंग.

WhatsApp सोबत तुम्हाला जलद, सोपे, सुरक्षित मेसेजिंग आणि कॉलिंग करता येईल तेही अगदी मोफत* , संपूर्ण जगभरात ते आता फोनवर उपलब्ध आहे.
आत्ता डाऊनलोड करा
* डेटा शुल्क आकारले जाऊ शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या प्रोव्हाइडरशी संपर्क साधा.

WhatsApp व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स

बोला मुक्तपणे

व्हॉइस कॉल्स च्या साहाय्याने आता तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांशी मनसोक्त गप्पा मारू शकता आणि तेही चक्क मोफत*, अगदी ते परदेशात असले तरीही. आणि जेव्हा तुमचा आवाज आणि मजकूर पुरेसा नसतो तेव्हा मोफत* व्हिडिओ कॉल्स च्या साहाय्याने आता तुम्ही अगदी समोरासमोर संभाषण साधू शकता. WhatsApp चे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स हे तुमच्या सेल्युलर प्लॅनचे व्हॉइस मिनिट्स न वापरता फोनचे इंटरनेट कनेक्शन वापरते, त्यामुळे तुम्हाला महागड्या कॉलिंग चार्जेसची चिंता करण्याची गरज नाही.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन

मूलभूत सुरक्षा

तुमचे अत्यंत खाजगी असे काही क्षण WhatsApp द्वारे शेअर केले जातात, आणि म्हणूनच आमची नवीन अॅप आवृत्ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच संपूर्णपणे कूटबद्ध केलेली आहे. जेव्हा तुमचे संदेश संपूर्णपणे कूटबद्ध केलेले असतात तेव्हा तुमचे संदेश आणि कॉल्स सुरक्षित केलेले असतात ज्यामुळे तुम्ही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही संवाद साधू इच्छित आहात तेच फक्त त्यांना वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही.
फीचर्स जाणून घ्या