WhatsApp सुरक्षितता

गोपनीयता आणि सुरक्षितता आमच्या रक्तात भिनलेली आहे

अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही WhatsApp यासाठी तयार केले आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांशी संपर्कात रहाल, नैसर्गिक आपत्ती च्या वेळी महत्वाची माहिती शेअर करू शकता, विभक्त झालेल्या कटुंबीयांना एकत्र आणू शकता किंवा सुखी जीवनाचा शोध घेऊ शकता. तुमचे काही अत्यंत खाजगी क्षण हे WhatsApp द्वारे शेअर केले जातात आणि त्यासाठीच आम्ही आमची नवीन आवृत्ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कूटबद्ध केलेली आहे. जेव्हा एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले असते तेव्हा तुमचे संदेश, फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेज/ध्वनी संदेश, डॉक्युमेंट्स आणि कॉल्स हे एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात लागण्यापासून सुरक्षित ठेवले जातात.

मूलभूत सुरक्षा

WhatsApp चे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच संपूर्ण कूटबद्धीकरण हे तेव्हा उपलब्ध होईल जेव्हा तुम्ही आणि लोक जे तुम्हाला संदेश पाठवितात ते अॅप ची नवीन आवृत्ती वापरत असतील. अनेक मेसेजिंग अॅप्स हे फक्त तुम्ही आणि त्यांच्यामध्येच कूटबद्ध केलेले असतात परंतु WhatsApp चे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन याची हमी देते की फक्त तुम्ही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही संभाषण साधत आहात तेच फक्त पाठविलेला मजकूर वाचू शकतात, यांव्यतिरिक्त इतर कोणीही नाही अगदी WhatsApp देखील नाही. हे शक्य होते कारण तुमचे संदेश हे एका कुलुपाने सुरक्षित केलेले असतात आणि फक्त प्राप्तकर्त्याकडेच त्याची विशिष्ट किल्ली असते ज्यामुळे तो ते कुलुप उघडून ते वाचू शकतो. अधिक सुरक्षेसाठी, तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक संदेशाला स्वतःची अशी एक स्वतंत्र कुलूप आणि किल्ली असते. हे सर्व ऑटोमॅटिकली/स्वयंचलित पणे होते : तुमचे संदेश सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला कोणतेही सेटिंग्ज अथवा एखादे सिक्रेट चॅट म्हणजेच गुप्त गप्पा सेट कराव्या लागत नाहीत.

बोला मुक्तपणे

WhatsApp कॉलिंग वापरून तुम्ही आता तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबीयांशी गप्पा मारू शकता अगदी ते दुसऱ्या देशात असले तरीही. जसे तुमचे संदेश एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कूटबद्ध केलेले आहेत त्याप्रमाणेच तुमचे WhatsApp कॉल्स देखील केलेले आहेत याचा अर्थ WhatsApp आणि तृतीय पक्ष त्यांना ऐकू शकत नाही.

संदेश जे राहतात तुमच्यासोबत

तुमचे संदेश हे तुमचाच हातात राहणे महत्वाचे आहे. म्हणूनच WhatsApp तुमचे संदेश एकदा का ते पोचवले की ते आमच्या सर्व्हर वर साठवत नाही, आणि एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच संपूर्ण कूटबद्धीकरण असल्याने WhatsApp आणि तृतीय पक्ष त्यांना वाचू शकत नाही.

तुम्ही स्वतः बघू शकता

WhatsApp तुम्हाला तुमचे संदेश आणि कॉल्स एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कूटबद्ध केलेले आहेत का ते पाहण्याची अनुमती देते. तुमच्या संपर्क माहिती किंवा गट माहिती च्या इंडिकेटर मध्ये बघा.

अधिक जाणून घ्या

WhatsApp च्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच संपूर्ण कूटबद्धीकरणाबद्दल अधिक सविस्तर स्पष्टीकरण येथे वाचा. हे Open Whisper Systems यांच्या कोलॅबोरेशन मध्ये डेव्हलप केलेले आहे.