मजकूर

सोपे, विश्वासार्ह मेसेजिंग

आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना संदेश पाठवा तेही अगदी मोफत*.संदेश पाठवण्यासाठी WhatsApp इंटरनेटचा वापर करते ज्यायोगे तुम्ही SMS साठीचे शुल्क टाळू शकता.
* डेटा शुल्क आकारले जाऊ शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या प्रोव्हाइडरशी संपर्क साधा.

गट गप्पा

संपर्कात राहण्यासाठी गट करा

ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्वाच्या आहेत जसे की तुमचे कुटुंबीय किंवा सहकारी यांच्या बरोबर संपर्कात रहा. गटगप्पांच्या साहाय्याने तुम्ही एकाचवेळी कमाल २५६ लोकांना संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता. तुम्ही तुमच्या गटाला नाव देऊ शकता, नोटिफिकेशन्स म्यूट किंवा नियंत्रित करू शकता, तसेच इतरही अनेक गोष्टी करू शकता.
मित्र
कुटुंब
आठवड्याच्या अखेरीस

वेब आणि डेस्कटॉप वर WhatsApp

संभाषण असेच चालू ठेवा

वेब आणि डेस्कटॉपवर असलेल्या WhatsApp च्या साहाय्याने तुम्ही सहजगत्या तुमच्या गप्पा तुमच्या संगणकावर सिन्क म्हणजेच सुसंबद्ध करू शकता ज्यायोगे तुम्हाला जे कोणते डिव्हाईस सोयीस्कर वाटते त्यावर तुम्ही गप्पा मारू शकता. आरंभ करण्यासाठी डेस्कटॉप अॅप डाऊनलोड करा किंवा web.whatsapp.com ला भेट द्या.

WhatsApp व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स

बोला मुक्तपणे

व्हॉइस कॉल्स द्वारे तुम्ही मित्रमैत्रिणी व कुटुंबियांशी बोलू शकता, तेही चक्क मोफत*, अगदी ते परदेशी असले तरीही. आणि जेव्हा तुमचा आवाज आणि मजकूर पुरेसा नसतो तेव्हा मोफत* व्हिडिओ कॉल्स द्वारे तुम्ही समोरासमोर संभाषण देखील साधू शकता. WhatsApp चे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स हे तुमच्या सेल्युलर प्लॅनचे व्हॉइस मिनिट्स न वापरता फोनचे इंटरनेट कनेक्शन वापरते, त्यामुळे तुम्हाला महागड्या कॉलिंग चार्जेसची चिंता करण्याची गरज नाही.
* डेटा शुल्क आकारले जाऊ शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या प्रोव्हाइडरशी संपर्क साधा.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन

मूलभूत सुरक्षा

तुमचे अत्यंत खाजगी असे काही क्षण WhatsApp द्वारे शेअर केले जातात, आणि म्हणूनच आमची नवीन अॅप आवृत्ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट म्हणजेच संपूर्णपणे कूटबद्ध केलेली आहे. जेव्हा तुमचे संदेश संपूर्णपणे कूटबद्ध केलेले असतात तेव्हा तुमचे संदेश आणि कॉल्स सुरक्षित केलेले असतात ज्यामुळे तुम्ही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही संवाद साधू इच्छित आहात तेच फक्त त्यांना वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही.

फोटो आणि व्हिडिओ

असे क्षण शेअर करा जे मोलाचे आहेत

WhatsApp वर आता तुम्ही तत्काळ फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता. बिल्ट इन कॅमेरा वापरून तुम्हाला जे क्षण मोलाचे वाटतात ते सुद्धा तुम्ही टिपू शकता. तुम्ही जरी मंद कनेक्शन वर असलात तरी WhatsApp च्या साहाय्याने तुम्ही अतिशय तत्परतेने फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता.

ध्वनी संदेश

तुमच्या मनात काय आहे ते बोला

कधीकधी तुमचा आवाज सर्वकाही सांगून जातो. फक्त एका टॅप ने तुम्ही ध्वनी संदेश रेकॉर्ड करू शकता, चटकन हॅलो म्हणण्यासाठी किंवा एखाद्या छोट्याशा कहाणीसाठी अगदी परफेक्ट.

दस्तऐवज

डॉक्युमेन्ट शेअरिंग सोपे करण्यात आले आहे

इमेल किंवा फाईल शेअरिंग अॅप ची उस्तवार न करता आता तुम्ही PDFs, डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, स्लाईडशोज आणि इतर पाठवू शकता. तुम्ही कमाल १०० MB इतक्या साईझचे डॉक्युमेंट्स पाठवू शकता त्यामुळे कोणापर्यंतही तुम्हाला जे हवे आहे ते पोहोचवणे अगदी सोपे होऊन जाईल.